AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीने आवडती भाजी बनविली नाही, त्यामुळे पती चिडला आणि त्याने अर्ध्या रात्री उचलले हे पाऊल

जेवणात आवडती भाजी न बनविल्याने नाराज झालेल्या पतीने पत्नीला यावरून जबर मारहाण करून असे कृत्य केले आहे की स्वत:च्याच पायावर कु-हाड मारली आहे.

पत्नीने आवडती भाजी बनविली नाही, त्यामुळे पती चिडला आणि त्याने अर्ध्या रात्री उचलले हे पाऊल
crime-2Image Credit source: socialmedia
| Updated on: Mar 01, 2023 | 11:33 AM
Share

भोपाळ : पती आणि पत्नीच्या संसारात अनेक वेळा छोट्याशा कारणांवरून वादाचे प्रसंग घडत असतात. परंतू आपण शुल्लक गोष्टीवरून रागाच्याभरात उचलले पाऊल नंतर महागात कसे पडते याचे मासलेवाईक उदाहरण मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात घडले आहे. येथे एका माणसाने पत्नीने आवडती भाजी न बनविल्याने घरालाच आग लावल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अजीब प्रकरण घडले आहे. या प्रकरणातील आरोपी त्याच्या पत्नीने रात्री भाजी ऐवजी डाळ बनविल्याने प्रचंड नाराज झाला. आणि त्याने पत्नीला बेदम मारहाण केली आणि नंतर आरोपीने स्वत:चे घर पेटवून दिले. या घटनेनंतर पती घर सोडून पळून गेल्याचे म्हटले जात आहे.

घराला त्याने असे पेटवले…

रात्री घरी आल्यावर जेवताना पत्नीने ताटात वाढलेले अन्न पाहून या शीघ्रकोपी पतीने स्वत:च्या पत्नीला आधी प्रचंड प्रमाणात मारहाण केली. नंतर संपूर्ण घरात केरोसिन टाकून त्याने  आग लावली. त्यामुळे घरातील बहुतांशी वस्तू जळून गेल्या आहेत.

दहा लाखांचे झाले नुकसान…

या प्रकरणा दोषी पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या आगीत घरातील सर्वच वस्तू जळाल्या आहेत. तसेच घराजवळची बाईकही जळून गेली आहे. या आगीत एकूण दहा लाखाचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात तिचे पती सोबत सतत भांडण होत होते. तसेच दोन महिन्यांपूर्वी पतीने घराची खिडकी तोडली होती. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकी सह तीन गुन्हे दाखल केले आहे. पत्नीने पोलीसांना दिलेल्या तक्रारी नूसार आरोपी पतीवर कलम ३२३, ५०४ आणि ४३६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, आणि आरोपीचा शोध सुरू केला आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....