पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच काढला पतीचा काटा, ‘त्या’ हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश

अखेर सीडीआर, गोपनीय माहिती तसेच विश्लेषणाच्या आधारे मार्ग काढत सातारा पोलिसांनी अखेर एका अल्पवयीन मुलासह 6 आरोपींची माहिती मिळाली. यापैकी 5 संशयित आरोपींना गोव्यातून अटक केली आहे.

पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच काढला पतीचा काटा, 'त्या' हत्याकांडाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश
साताऱ्यातील हत्येचा खुलासा करण्यास यशImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 8:12 PM

सातारा / संतोष नलावडे (प्रतिनिधी) : मागील आठवड्यात साताऱ्यातील वाढेगावच्या हद्दीत एका व्यक्तीची गोळीबार करत गळा चिरून केलेल्या हत्येचा छडा लावण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. साताऱ्याच्या शुक्रवार पेठेत राहणारे अमित भोसले यांची वाढेगावमधील एका हॉटेल समोर हत्या करण्यात आली होती. पतीचे बाहेर अनैतिक संबंध होते. यामुळे पती नेहमी त्रास द्यायचा, या कारणातून पत्नीनेच पतीची सुपारी देऊन हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे आरोपी पत्नी सातारा पोलीस दलात कार्यरत आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. सहावा आरोपी अल्पवयीन आहे.

24 जानेवारी रोजी झाली होती हत्या

साताऱ्यात 24 जानेवारीच्या रात्री दिडच्या सुमारास वाढे फाटा परिसरात अमित भोसले याची गोळ्या झाडून आणि गळा चिरून हत्या करण्यात आली होती. यानंतर साताऱ्यात एकच खळबळ माजली होती.

पोलिसांनी याकडे गांभिर्याने लक्ष घालत 10 पोलीस पथकं आरोपींच्या शोधासाठी पाठवली होती. हत्या ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी खूप अंधार होता. त्यामुळे कोणताच सबळ पुरावा उपलब्ध नसल्याने तपासात मोठा अडथळा निर्माण झाला होता.

हे सुद्धा वाचा

मात्र एसपी समीर शेख यांनी पोलीस दलातील खास डिटेक्शनमधील माहीर अधिकाऱ्यांना काही सुचना देऊन त्यांच्यावर मदार सोपवत तपासाची चक्र फिरवली. राज्यातील सुमारे 7 जिल्हे पोलीस पथकांनी पालथे घातले.

पाच आरोपींना अटक

अखेर सीडीआर, गोपनीय माहिती तसेच विश्लेषणाच्या आधारे मार्ग काढत सातारा पोलिसांनी अखेर एका अल्पवयीन मुलासह 6 आरोपींची माहिती मिळाली. यापैकी 5 संशयित आरोपींना गोव्यातून अटक केली आहे.

सुपारी देणारी पत्नी सातारा पोलीस दलातील कर्मचारी

यातील धक्कादायक बाब म्हणजे या खुनाची सुपारी मयत अमित भोसले याच्याच सातारा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पत्नीनं दिली असल्याचं तपासात निष्पंन्न झालं आहे. यातील काही आरोपी पुण्यातील असून बाकी आरोपी साताऱ्यातील असल्याचं सांगण्यात आले.

पतीच्या त्रासाला कंटाळून त्याची हत्या

पत्नीला मयत अमित भोसले सतत त्रास देत होता. सतत भांडणं होत होती आणि त्याचे बाहेर अनैतिक संबंध होते, याच कारणातून मयत अमित भोसले यांच्या पत्नीने त्याचा काटा काढल्याची कबुली आरोपीनं दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.