अकोला जिल्हातल्या अकोटमध्ये भरदिवसा सशस्त्र दरोडा, लसीकरण पथक असल्याचा बनाव करून आले होते दरोडेखोर

खोलीत बंद असलेल्या आजोबा-आजी व नातीने कशीतरी तोडांचे बोळ काढून खिडकीतून आरडाओरडा केली असता आजुबाजूचे शेजारी धावत आले. तोपर्यत दरोडेखोर बाहेरून घराचा दरवाजा बंद करुन पळून गेले होते. शेजारच्या लोकांनी दरवाजा उघडून या तिघांची सुटका केली.

अकोला जिल्हातल्या अकोटमध्ये भरदिवसा सशस्त्र दरोडा, लसीकरण पथक असल्याचा बनाव करून आले होते दरोडेखोर
अकोला जिल्हातल्या अकोटमध्ये भरदिवसा सशस्त्र दरोडा

अकोला : अकोला जिल्हातल्या अकोटमध्ये कोरोना लसीकरणाचे पथक असल्याचा बनाव करीत शहरात भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना आज दुपारी घडली. या दरोडेखोरांनी घरातील तिघांना जबर मारहाण करुन तोडांत बोळे कोंबून दोरीने एका खालीत बांधून ठेवले होते. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. (Theft in Akot in Akola district claiming corona vaccination)

कोरोना लसीकरण चौकशी पथक असल्याचा बनाव करीत घुसले

अकोट शहरातील प्रचंड रहदारी असलेल्या जवाहररोड लगत बुधवार वेस परिसरात प्रसिद्ध व्यापारी अमृतलाल सेजपाल हे आपल्या कुंटुंबासह राहतात. त्यांच्या घरी आज दुपारी 2.30 ते 3 वाजता दरम्यान काही महिला व पुरुष आले. त्यांनी दरवाजा वाजवून कोरोना लसीकरण चौकशी पथक असल्याचा बनाव केला. यावेळी दरवाजातच सेजपाल यांची नात देलिशा हिने मी विद्यार्थी असल्याने लस घेतली नाही सांगितले. त्यामुळे या बनावट पथकाने घरात कोणकोण आहे अशी विचारणा करताच देलिशा हिला शंका आली आणि तिने ओळखपत्र मागितले. यावेळी दरोडेखोर टोळीतील एक महिला दरवाजा जोरात लोटत घरात घुसली.

घरातील वयोवृद्ध अमृतलाल सेजपाल व त्यांची पत्नी इंदुबहन सेजपाल आणि नात देलिशा यांना मारहाण करीत तोडांत बोळे कोबंत चिकटपट्या लावल्या. तसेच दोरीने बांधून एका खोलीत कोंडून ठेवले. अमृतलाल सेजपाल यांना सशस्त्र मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर घरातील सामानाची फेकफाक करीत कपाटं फोडली. घरातील एक मोबाईल आणि 2 ते 3 हजार रुपयांची रोख घेऊन गेल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिली आहे.

दरम्यान दुसरीकडे एका खोलीत बंद असलेल्या आजोबा-आजी व नातीने कशीतरी तोडांचे बोळ काढून खिडकीतून आरडाओरडा केली असता आजुबाजूचे शेजारी धावत आले. तोपर्यत दरोडेखोर बाहेरून घराचा दरवाजा बंद करुन पळून गेले होते. शेजारच्या लोकांनी दरवाजा उघडून या तिघांची सुटका केली. या प्रसंगानंतर तिघेही खूपच घाबरले असून पळून गेलेल्या दरोडेखोरांचा तपास अकोट शहर पोलीस करत आहेत. (Theft in Akot in Akola district claiming corona vaccination)

इतर बातम्या

Video : अमेरिकेला मदत करणाऱ्याला हेलिकॉप्टरला टांगून हत्या, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

कोरोना रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या घटनांची जबाबदारी आता संचालकांची; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI