Ambernath Theft : अंबरनाथमध्ये हार्डवेअरच्या दुकानात चोरी, चोरी करून पळताना चोरटे सीसीटीव्हीत कैद

एकाने दुकानदाराला वॉशिंग मशिनचा पाईप दाखवण्यासाठी बाहेर बोलावलं आणि दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवलं. तर दुसऱ्या चोरट्याने दुकानात जाऊन स्क्रू ड्रायव्हरने ड्रॉव्हर उचकटला आणि त्यातले 50 हजार रुपये चोरले.

Ambernath Theft : अंबरनाथमध्ये हार्डवेअरच्या दुकानात चोरी, चोरी करून पळताना चोरटे सीसीटीव्हीत कैद
देहू संस्थानचे विश्वस्त विशाल मोरेंना जुगार खेळणे भोवणारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 1:58 AM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका हार्डवेअरच्या दुकानात चोरी (Theft) करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन जणांनी मिळून ही चोरी केली असून एकाने दुकानदाराला बोलण्यात गुंतवलं, तर दुसऱ्याने गल्ल्यातले 50 हजार रुपये चोरी केले. चोरटे (Thieves) दुकानातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सदर घटना 29 जुलै रोजी घडली असून, याप्रकरणी 2 ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांसह व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

भरदुपारी चोरट्यांनी दुकानात घुसून 50 हजार रुपये लांबवले

अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन परिसरात अंबिका हार्डवेअर नावाचं दुकान आहे. या दुकानात 29 जुलै रोजी दुपारी दोन चोरटे आले. यापैकी एकाने दुकानदाराला वॉशिंग मशिनचा पाईप दाखवण्यासाठी बाहेर बोलावलं आणि दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवलं. तर दुसऱ्या चोरट्याने दुकानात जाऊन स्क्रू ड्रायव्हरने ड्रॉव्हर उचकटला आणि त्यातले 50 हजार रुपये चोरले. चोरटे दुकानात येताना आणि पळून जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. शिवाजीनगर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

आमदार बालाजी किणीकरांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट

अंबरनाथ पूर्व भागात गेल्या काही दिवसात गुन्हेगारी वाढली असून त्यावर अंकुश ठेवण्यात पोलीस कमी पडत असल्याची नाराजी अंबरनाथ व्यापारी संघटना आणि डॉक्टर असोसिएशनने व्यक्त केली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी संघटना आणि डॉक्टर असोसिएशनने पोलीस उपायुक्तांची भेट घेतली. चोरी, घरफोडी हे प्रकार नित्याचे झालेले असताना चेन स्नॅचिंग, दरोडा, गोळीबार, हत्या असे प्रकार अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसात घडले आहेत. या सगळ्याला पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप अंबरनाथ व्यापारी संघटनेनं केलाय. तर डॉक्टर संघटनेनेही या सगळ्याबाबत नाराजी व्यक्त केलीये. हीच नाराजी व्यक्त करण्यासाठी व्यापारी संघटना आणि डॉक्टर्स संघटनेच्या प्रतिनिधींनी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची भेट घेतली. (Theft in hardware shop in Ambernath, thieves caught on CCTV)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.