AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येवल्यात चोरट्यांचा धुमाकूळ; 7 ठिकाणी चोऱ्या, 2 मंदिरातल्या दानपेट्या फोडल्या

येवला शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, त्यांनी तब्बल 7 ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.

येवल्यात चोरट्यांचा धुमाकूळ; 7 ठिकाणी चोऱ्या, 2 मंदिरातल्या दानपेट्या फोडल्या
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 3:29 PM
Share

लासलगावः येवला शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, त्यांनी तब्बल 7 ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर येवला शहरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पटेल कॉलनी, आनंद नगर, मोरे वस्ती या कॉलनी भागात 7 ठिकाणी चोरी करत धुमाकूळ घातला आहे. यात 5 ठिकाणी बंद घरांच्या दरवाज्याचे कुलूप तोडत चोरी केली, तर परिसरातील राधाकृष्ण मंदिरातील दानपेटीतील रक्कम देखील चोरून नेली आहे. त्याचप्रमाणे आनंदनगर भागातील गणपती मंदिराची दानपेटी फोडत चोरट्यांनी त्यातील रक्कम देखील लंपास केली आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर चोरीच्या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले असून, पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीय करीत आहेत.

नाशिकचा तरुण बेपत्ता

नाशिकचा तरुण इगपुरीमधून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. निखिल नाना केदारे (वय 23) हा तरुण नाशिकमधल्या इंदिरानगर भागातील रथचक्र सोसायटीत आपल्या आई-वडिलांसह रहायचा. मात्र, निखिल 21 ऑक्टोबर रोजी इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील सिंधू नरवाडे या मित्राला भेटायला गेला. त्याची व त्या मित्राची भेट झाली. त्यानंतर तो कोणाला काहीही न सांगता निघून गेला. निखिलची आई मंगला नाना केदारे (वय 50) यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. निखिलची शरीरयष्टी सडपातळ आहे. त्याची उंची 5 फूट 5 इंच असून रंगाने गोरा, चेहरा गोल, नाक सरळ आहे.

फटाके फोडणारा मुलगा गंभीर जखमी

फटाके फोडणे एका सात वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतले असून, त्याच्यावर आता नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकच्या इंदिरानगर मधील पांडवनगरीत राहणाऱ्या शौर्य लाखोडे हा सात वर्षांचा मुलगा मित्रांसोबत फटाके फोडत होता. त्यांची रोजप्रमाणेच धमाल मस्ती सुरू होती. ते फटाके पेटवायचे आणि बाजूला फेकायचे. मोठा आवाज व्हायचा. त्यानंतर ही मित्रमंडळी टाळ्या वाजवायची. असा खेळ बराच वेळ रंगला. मात्र, अचानक एका मित्राने फटाका पेटवून बाजूला फेकला. तो नेमका शौर्यच्या अंगावर पडला. त्यामुळे त्याच्या कपड्यांनी पेट घेतला. सोबत फटाकाही वाजला. यामुळे शौर्य मोठ्या प्रमाणात भाजला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इतर बातम्याः

नाशिककरांचं अनोखं पर्यावरण प्रेमः 100 झाडांनी बहरलेल्या उद्यानाचा जंगी वाढदिवस साजरा!

गब्बर कांदा व्यापाऱ्यांचे कारनामेः 100 कोटींचा ब्लॅकमनी जमीन खरेदीत, नाशिकमधले 26 जण रडारवर

ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिक महापालिकेत नोकर भरतीचा बार; आयटी हब, लॉजिस्टिक पार्कसाठी जोर

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...