रेल्वेमध्ये 5 लाखांचे दागिने चोरले, बुलडाण्याच्या विहिरीत लपवले, 2 चोरट्यांस तीन महिन्यानंतर बेड्या

नवजीवन एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या आंध्र प्रदेशच्या महिलेची दागिने ठेवलेली पर्स चोरणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात आलंय. शेगाव रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली.

रेल्वेमध्ये 5 लाखांचे दागिने चोरले, बुलडाण्याच्या विहिरीत लपवले, 2 चोरट्यांस तीन महिन्यानंतर बेड्या
Buldana crime
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 7:11 PM

बुलाडाणा  : नवजीवन एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या आंध्र प्रदेशच्या महिलेची दागिने ठेवलेली पर्स चोरणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात आलंय. शेगाव रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. महिलेच्या पर्समध्ये एकूण 8 लाख रुपयांचे दागिने होते. तब्बल तीन महिने तपास करुन पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही चोरटे यवतमाळचे रहिवासी आहेत. (thiefs arrested in buldhana who stole purse with 85 lakh rupees gold jewellery)

रेल्वेमधून पर्समधील सोन्याच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशमधील विजयवाडाचे रहिवासी आकाश कुमार रुपसिंग राजपुरोहित यांचे कुटुंबीय सुपरफास्ट नवजीवन एक्स्प्रेसमधील बर्थ नंबर 29 एस 9 बोगीमधून 27 एप्रिल रोजी प्रवास करत होते. यावेळी आकाशकुमार यांच्या आई जमुनादेवी राजपुरोहित यांच्या बर्थजवळ ठेवलेली लेडीज हण्डबॅग पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि मोबाईल हँडसेट असा एकूण 8 लाख 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल होता.

मोबाईल ट्रेस करत आरोपींचा घेतला शोध

हा प्रकार घडल्यानंतर प्रवासादरम्यान झोपेचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने ती पर्स चोरून नेल्याची तक्रार आकाश कुमार रूपसिंग राजपुरोहित यांनी शेगाव रेल्वे पोलीस स्टेशन येथे दिली होती. त्यावरून भादविच्या कलम 379 अनुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात चोरीला गेलेल्या मोबाईलची ट्रेसिंग 30 जुलै रोजी पोलीस ठाण्याला प्राप्त झाली होती. त्यात सदर मोबाईल हा यवतमाळ येथे असलयाचे समजल्यावरून पोलिसांनी त्यावरून यवतमाळ येथे जाऊन चोरीला गेलेला वन प्लस सेव्हन प्रो कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल हस्तगत केला

चोट्यांनी विहिरीत लपवले होते दागिने

त्याचा माग काढून मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ ट्यूबलाइट आणि देविदास राठोड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या आरोपींकडून आतापर्यंत 5 लाख 8 हजार 604 रुपयांचे सोन्याचे दागिने रिकव्हर करून घेतले आहेत. उल्लेखनीय म्हणजे यात चोरट्यांनी काही दागिने बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शिवारातील एका विहिरीत लपविले होते.

इतर बातम्या :

Video | पुण्यात मयत गुंडाच्या वाढदिवशी चेल्यांचा धिंगाणा, पिस्तूल, तलवारीसह दहशत माजवण्याचा प्रयत्न

Video | औरंगाबादेत मद्यधुंद तरुणांची अरेरावी, शिवीगाळ करत पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल

एनसीबीची मोठी कारवाई, मुंबईत 2 ड्रग पेडलर्सना अटक, कारवाईदरम्यान, 2 अधिकारी किरकोळ जखमी

(thiefs arrested in buldhana who stole purse with 85 lakh rupees gold jewellery)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.