भंडाऱ्यात नगरपंचायतीत एसीबीची मोठी कारवाई, लाच स्वीकारताना तिघांना रंगेहाथ पकडले !

फिर्यादीच्या शेतीची मोक्का पाहणी करून विकास आणि छाननी शुल्क पावती देण्याकरीता तसेच रेखांकन मंजुरीकरीता अंतिम शिफारस पुढे पाठविण्याकरीता लाच मागितली होती.

भंडाऱ्यात नगरपंचायतीत एसीबीची मोठी कारवाई, लाच स्वीकारताना तिघांना रंगेहाथ पकडले !
भंडाऱ्यात लाच स्वीकारताना तिघांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 12:43 PM

भंडारा / तेजस मोहतुरे (प्रतिनिधी) : प्लॉटच्या अकृषक नाहरकत प्रमाणपत्रासाठी लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर नगरपंचायतच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. आरोपींना 1 लाख 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. यात स्थापत्य अभियंता गजानन मनोहर कराड, कनिष्ठ लिपिक विजय राजेश्वर करंडेकर, खासगी वाहन चालक मुखारण लक्ष्मण देसाई यांचा समावेश आहे. या तिन्ही कर्मचाऱ्यांना लाखांदूर पोलीस ठाण्यात नेल्यानंतर रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.

शेतीसंदर्भात प्रमाणपत्र देण्याकरीता मागितली होती लाच

लाखांदूर येथील रहिवाशी असलेल्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार एसीबीने ही कारवाई केली. फिर्यादीच्या शेतीची मोक्का पाहणी करून विकास आणि छाननी शुल्क पावती देण्याकरीता तसेच रेखांकन मंजुरीकरीता अंतिम शिफारस पुढे पाठविण्याकरीता लाच मागितली होती.

आरोपींनी प्रमाणपत्र देण्याचा मोबदला म्हणून 1 लाख 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. स्वतःच्याच जमिनीवर बांधकामासाठी परवानगी देताना केवळ पैशासाठी त्रास देऊन तीन वर्षापासून आरोपींनी प्रकरण प्रलंबित ठेवले होते.

हे सुद्धा वाचा

एसीबीने पैसे घेताना रंगेहाथ पकडले

अखेर त्रस्त झालेल्या तक्रारकर्त्याने लाच लुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी खासगी वाहन चालक मुखारण देसाई यांना तक्रारदाराकडे पाठवे होते.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल

लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ धाड टाकून लाच स्वीकारल्या प्रकरणी लाखांदूर नगरपंचायत अभियंता गजानन मनोहर कराड, कनिष्ठ लिपिक विजय कारांडेकर, खासगी वाहन चालक मुखारण देसाई या तिघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अन्वये गुन्ह्याची नोंद करून अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.