CCTV Video : डोंबिवलीत कपड्याच्या डिस्प्लेसाठी लावलेल्या पुतळ्यावरुन वाद, दुकान मालकासह तिघांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

शेलार यांनी काल मंगळवारी पुन्हा देवराजला पुतळा हटवण्यास सांगितले. याच कारणावरून देवराज दुबरिया, त्याचे दोन मुलगे मयुर आणि प्रितेश यांनी शेलार याच्या दुकानात शिरून दुकानातील छत्री व इतर सामान घेऊन शेलार यांच्यासह त्यांची पत्नी सुवर्णा आणि मेहुणी अंजना यांना बेदम मारहाण केली.

CCTV Video : डोंबिवलीत कपड्याच्या डिस्प्लेसाठी लावलेल्या पुतळ्यावरुन वाद, दुकान मालकासह तिघांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
डोंबिवलीत कपड्याच्या डिस्प्लेसाठी लावलेल्या पुतळ्यावरुन वादImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 10:51 PM

डोंबिवली : कपड्यांच्या डिस्प्लेसाठी लावलेला पुतळा हटवण्यावरुन झालेल्या वादा (Dispute)तून एका दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराला मारहाण (Beating) केल्याची घटना डोंबिवली पूर्वतील रामनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप पोलिसांनी या तिघांना अटक केली नाही. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. देवराज पटेल दुबरीया, मयुर पटेल दुबरीया, प्रितेश पटेल दुबरीया अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी बाजूच्या दुकानमालकासह त्याची पत्नी आणि मेहुणीला मारहाण केली आहे.

दुकानमालकाला मारहाण करत साहित्याची तोडफोड केली

डोंबिवली पूर्वेला स्टेशनच्या बाहेर राजेंद्र शेलार यांचे कपड्याचे आणि इतर साहित्याचे दुकान आहे. शेलार यांच्या दुकानाच्याच शेजारी देवराज पटेल दुबरीया याचे देखील कपड्याचे दुकान आहे. देवराज पटेल दुबरीया हा आपल्या दुकानातील कपड्याचा पुतळा शेलार यांच्या दुकानाला खेटून ठेवत असे. अनेक वेळा विनंती करूनही देवराज तो पुतळा हटवत नव्हता. शेलार यांनी काल मंगळवारी पुन्हा देवराजला पुतळा हटवण्यास सांगितले. याच कारणावरून देवराज दुबरिया, त्याचे दोन मुलगे मयुर आणि प्रितेश यांनी शेलार याच्या दुकानात शिरून दुकानातील छत्री व इतर सामान घेऊन शेलार यांच्यासह त्यांची पत्नी सुवर्णा आणि मेहुणी अंजना यांना बेदम मारहाण केली. तसेच दुकानातील साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

जखमी शेलार कुटुंबीयांनी देवराज दुबरिया, मयूर दुबरीया आणि प्रितेश दुबरीया यांच्या विरोधात रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रामनगर पोलिस पुढील तपास करत आहेत. मात्र गुन्हा दाखल होऊन सीसीटीव्ही असूनही पोलीस आरोपींना अटक करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Three people including shop owner were beaten up due to petty dispute in Dombivli)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.