CCTV Video : कल्याण रेल्वे स्थानकातून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद; आरोपी अटक

बिहारमधील रहिवासी असलेली संजुदेवी राजवंशी ही महिला आपल्या कुटुंबासोबत भांडण करुन चार दिवसापूर्वी मुलासह घर सोडून कल्याणमध्ये आली होती. मोलमुजरी करत उदरनिर्वाह करण्यासाठी ती बिहारहून कल्याणमध्ये ती कामाच्या शोधात आली होती.

CCTV Video : कल्याण रेल्वे स्थानकातून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद; आरोपी अटक
कल्याण रेल्वे स्थानकातून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण
Image Credit source: TV9
सुनील जाधव

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 18, 2022 | 9:28 PM

कल्याण : रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवरून अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण (Kidnapping) करणाऱ्या दोन आरोपींच्या कल्याण रेल्वे पोलिसांनी अवघ्या सात तासात मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अमित शिंदे आणि पूजा मुंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. अपहरणाची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे स्टेशन परिसरासह आजूबाजूच्या परिसरात शोध घेत उल्हासनगर येथील झोपडपट्टीतून या दोघांना जेरबंद (Arrest) करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे फिरस्ते आहेत. मिळेल ते काम करत उदरनिर्वाह करतात. दरम्यान या दोघांनी या मुलाला का पळवलं ? त्यांनी आधी असे प्रकार केले आहेत का ? मुले चोरणाऱ्या रॅकेटशी संबंधित आहेत का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

महिला वडापाव आणायला गेल्याची संधी साधत मुलाचे अपहरण केले

बिहारमधील रहिवासी असलेली संजुदेवी राजवंशी ही महिला आपल्या कुटुंबासोबत भांडण करुन चार दिवसापूर्वी मुलासह घर सोडून कल्याणमध्ये आली होती. मोलमुजरी करत उदरनिर्वाह करण्यासाठी ती बिहारहून कल्याणमध्ये ती कामाच्या शोधात आली होती. रात्री झोपण्यासाठी ती कल्याण स्टेशनचा आसरा घेत होती. काल रात्री नेहमीप्रमाणे ती आपल्या चिमुकल्यासह कल्याण रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या आडोशाला झोपली होती. मुलाला झोप लागल्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ती भूक लागली म्हणून रात्री मुलाला तिथेच ठेवून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गेली. वडापाव घेऊन परत येऊन बघितलं असता तिचा मुलगा तिला दिसला नाही. आजूबाजूला बराच वेळ तिने शोधाशोध केली, विचारपूस केली. मात्र मुलगा न सापडल्याने संजूदेवी हिने कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठले आणि मुलगा हरवल्याबाबतची तक्रार नोंदवली.

सीसीटीव्हीच्या आधारे सात तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या

रेल्वे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत मुलाच्या शोधासाठी पथके नेमली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अर्चना दुसाने, पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या पथकाने शोध सुरू केला. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासले असता या सीसीटीव्हीमध्ये एक तरुण व एक महिला त्या मुलाला घेऊन जाताना दिसून आलं. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आजूबाजूच्या परिसरात सुद्धा शोध सुरू केला. अवघ्या काही सात तासात आजूबाजूचे नागरिक व 100 पेक्षा अधिक लोकांच्या मदतीने सीसीटीव्हीमध्ये दिसणारा तरुण आणि महिलेला उल्हासनगर येथील खेमानी झोपडपट्टीतून शोधून काढले. त्या बाळाला सुखरूप ताब्यात घेतले. आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आहे. (Two and a half year old boy kidnapped from Kalyan railway station, incident caught on CCTV)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें