भरबाजारात व्यावसायिकांवर प्राणघातक हल्ला, कुणी केला हल्ला?

अहमदनगरमधील कापडबाजारात आज धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुले व्यापारी वर्गातही संताप दिसून येत आहे.

भरबाजारात व्यावसायिकांवर प्राणघातक हल्ला, कुणी केला हल्ला?
नगरमध्ये भरबाजारात व्यापाऱ्यांवर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 8:29 PM

अहमदनगर / कुणाल जायकर : भरबाजारात दोन व्यापाऱ्यांवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर शहरात घडली आहे. हल्ल्यात दोघेही व्यापारी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपक नवलानी आणि प्राणिल बोगावत अशी हल्ला झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाबाहेर व्यापाऱ्यांची मोठी गर्दी जमली आहे. कापड बाजारातील व्यापाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद करण्याचा घेतला आहे.

हल्ल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट

हा हल्ला कुणी आणि कोणत्या कारणातून केला, याबाबत अद्याप कळू शकले नाही. मात्र शहरातील कापड बाजार परिसरात गेल्या काही दिवसांपासून फेरीवाले आणि दुकानदार यांच्यात वाद सुरू आहेत. या वादातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तपासाअंतीच सत्य उघड होईल. या घटनेमुळे व्यापारी वर्गात संतापाची भावना असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

या हल्ला प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींच्या अटकेनंतरच हल्ल्यामागचे कारण स्पष्ट होईल. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील कांदिवली परिसरात 30 रुपयांसाठी मारहाण

मुंबईतील चारकोप येथील एका मेडिकल दुकानात अवघ्या 30 रुपयांसाठी मारहाण आणि तोडफोड केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर मेडिकलच्या दुकानात औषधे घेण्यासाठी गेले होते. यावेळी मेडिकलमधील व्यक्तीने त्याच्याकडे 30 रुपये मागितले. याच गोष्टीवरून वाद झाला आणि त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी मेडिकलच्या दुकानात घुसून मारामारी सुरू केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.