AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railways | हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडताना इंजिनची धडक, तरुणाचा मृत्यू, नेमके काय झाले? वाचा…

गांधी नगर येथील साळीग्रामचा 20 वर्षीय मुलगा अजय हा बाजारासाठी घरातून निघाला होता. कानात हेडफोन लावून तो रेल्वे रुळ ओलांडत होता. तेव्हा चित्रकूटला जाणाऱ्या ट्रेनच्या ड्रायव्हरला तो तरुण दिसल्याने त्या ड्रायव्हरने ट्रेनची स्पीड कमी करत जोर जोरात हॉर्न देखील वाजवले.

Railways | हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडताना इंजिनची धडक, तरुणाचा मृत्यू, नेमके काय झाले? वाचा...
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 04, 2022 | 11:02 AM
Share

उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका तरूणाला हेडफोन लावणे इतके महागात पडले आहे की, त्याला त्याचा जीव गमवावा लागला. रेल्वे रूळ (Railway line) ओलांडत असताना त्याला ट्रेनची धडक बसली आणि तो गंभीर जखमी झाला. रक्ताने माखलेल्या तरुणाला आजूबाजूच्या लोकांनी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात (Hospital) पाठवले. मात्र, वाटेतच तरूणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी (Police) मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

इंजिनला धडकल्याने तरूण दूर उडून पडला

गांधी नगर येथील साळीग्रामचा 20 वर्षीय मुलगा अजय हा बाजारासाठी घरातून निघाला होता. कानात हेडफोन लावून तो रेल्वे रुळ ओलांडत होता. तेव्हा चित्रकूटला जाणाऱ्या ट्रेनच्या ड्रायव्हरला तो तरुण दिसल्याने त्या ड्रायव्हरने ट्रेनची स्पीड कमी करत जोर जोरात हॉर्न देखील वाजवले. मात्र कानात हेडफोन लावल्याने तरूणाला काहीच आवाज ऐकू आला नाही आणि इंजिनला धडकल्याने तो दूर उडून पडला आणि तो यामध्ये गंभीर जखमी झाला.

दवाखान्यात जातानाच तरूणाचा मृत्यू

गंभीर जखमी झालेल्या तरूणाला नागरिकांनी लगेचच दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अजयला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, त्याचा रस्त्यामध्येच मृत्यू झाला. अजय हा दोन भावांमध्ये सर्वात लहान होता. या घटनेनंतर कुटुंब दुखात आहे.

हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडणे पडले महागात

याप्रकरणी पोलीस स्टेशनचे एसएचओ अनूप दुबे यांनी सांगितले की, एक तरुण कानाला हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडत असताना त्याला ट्रेनची धडक बसली. लोकांनी त्याला आवाजही दिला पण कानात हेडफोन असल्याने ऐकू येत नव्हते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पीएमसाठी पाठवण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार