AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी तिचा पहिला पेशंट, ती माझी शेवटची डॉक्टर…हॉटेल रुम, रहस्य, इंजिनिअरने जाता-जाता मागे अनेक प्रश्न सोडले

वडिलांना फोन केला तेव्हा समजलं की, त्याने गाजियबाद येथून इंजिनिअरींग केलीय. तो अविवाहित होता. पावणेदोन वर्षांपूर्वी त्याच्या आईच निधन झालेलं. वडिल आणि रोहित घरीच रहायचे. त्यांचा मोठा मुलगा IIT मुंबईतून शिकून वैज्ञानिक बनला.

मी तिचा पहिला पेशंट, ती माझी शेवटची डॉक्टर...हॉटेल रुम, रहस्य, इंजिनिअरने जाता-जाता मागे अनेक प्रश्न सोडले
Hotel Room Image Credit source: Representative Image
| Updated on: Aug 05, 2025 | 12:51 PM
Share

एका इंजिनिअरने हॉटेलच्या खोलीत आयुष्य संपवलं. मृताची ओळख पटली असून त्याचं नाव रोहित आहे. ते मेरठचा निवासी आहे. एका पेन ड्राइव्हमध्ये रोहितची सुसाइड नोट सापडली. त्यात रोहितने आपल्या इच्छांची यादी टाकली आहे. उत्तर प्रदेशच्या आगरा शहरात खूबसूरत हॉटेलमध्ये ही घटना घडली. रविवारी रात्री मेरठच्या एका इंजिनिअरने गळफास घेऊन जीवन संपवलं. दुसऱ्यादिवशी हॉटेल स्टाफला संशय आल्यानंतर त्यांनी दरवाजा ठोठावला. पण आतून काही आवाज आला नाही. मग पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये इंजिनिअरचा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह होता. हे पाहून सगळेच हडबडले. तात्काळ मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. मृतदेहाजवळचा पेन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतला.

पेन ड्राइव्ह तपासल्यानंतर त्यात बऱ्याच विचित्र गोष्टी आढळून आल्या. पीडीएफ फाइलमध्ये सुसाइड नोट मिळाली. रोहित पुत्र सुखदेव चंद असं मृताच नाव आहे. मेरठच्या शिवरामपुरम, गोलाबाग रोहटा मार्ग इथे तो रहायचा.

तपासासाठी फॉरेन्सिक टीमला बोलावलं

मोठा मुलगा आणि दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. वडिलांनी सांगितलं की, रोहित 10 जुलैपासून घराबाहेर होता. कुठे चाललोय ते रोहितने सांगितलं नाही. वडिल पोलीस दलात होते. ते आता रिटायर आहेत. पोलिसांनी हॉटेलमध्ये तपासासाठी फॉरेन्सिक टीमला बोलावलं. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला.

13 दिवसांचा ड्रामा करण्याची आवश्यकता नाहीय

रोहितच्या सुसाइड नोटमधूनही त्याचं आत्महत्येच कारण स्पष्ट नाहीय. त्याने कोणालाही जबाबदार ठरवलं नाहीय. रोहित रविवारी संध्याकाळी हॉटेलमध्ये रहायला आलेला. “काही करण्याची गरज नाही. मी जसा गायब आहे, तसच राहू दे. मला कुठला ड्रामा नकोय. 13 दिवसांचा ड्रामा करण्याची आवश्यकता नाहीय. नातेवाईकांना काही सांगण्याची गरज नाहीय” असं त्याने लिहिलय.

मी तिचा पहिला पेशंट आणि ती माझी शेवटची डॉक्टर

सुसाइड नोटच्या एका कॉलमध्ये लिहिलय की, “लास्ट टाइम यू टर्न मारायचा असता, तर डॉक्टरने वाचवलं असतं. मी तिचा पहिला पेशंट आणि ती माझी शेवटची डॉक्टर. माझं शरीर एसएन मेडिकल कॉलेजला दान करा. शक्य झाल्यास अंगदान करा. मी गायब होऊ शकतो. पण माझी बॉडी नाही, म्हणून मी हे सर्व लिहिलं” सुसाइड नोट इंग्लिश आणि रोमनमध्ये लिहिली आहे.

फाइलच नाव मोहित पीडीएफ

पेन ड्राइव्हच्या फाइलच नाव मोहित पीडीएफ आहे. पेन ड्राइवमध्ये मिळालेली रोहितची सुसाइड नोट स्पष्ट नाहीय. सुसाइड नोटमध्ये त्याने एसएन मेडिकल कॉलेज आणि एक महिला डॉक्टरच नाव आणि नंबर लिहिला आहे. पुढे लिहिलय कोणाला तपास करण्याची आवश्यकता नाही. हा माझा निर्णय आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.