डेंजर बबली, आधी नवऱ्याची मर्डर, मग जेलमध्ये नवीन बॉयफ्रेंड, एकदिवस सासऱ्याला बाजरीच्या शेतात नेऊन तिथे..
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी महिला पतीच्या हत्येच्या प्रकरणात सव्वापाच वर्ष तुरुंगात होती. तुरुंगातच तिचं प्रेम प्रकरण सुरु झालं. तुरुंगातच तिची ओळख प्रेम सिंह सोबत झाली. तिथे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रेम सिंहनेच बबलीचा जामीन केला.

सध्या पोलीस बबलीचा शोध घेत आहेत. आधी बबलीने नवऱ्याला मारलं. सव्वापाच वर्ष तुरुंगात राहिली. तिथे तिला नवीन बॉयफ्रेंड मिळाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिने सासऱ्याची हत्या केली. आगरा पोलीस या बबलीचा शोध घेत आहेत. तिच्यावर सासऱ्याची हत्या केल्याचा आरोप आहे. बबलीच्या सासूने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर FIR नोंदवण्यात आलाय. बुधवारी रात्री प्रेम संबंधांच्या मार्गात अडथळ ठरणाऱ्या सासऱ्याची बबलीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. सासऱ्याचा मृतदेह शेतात टाकून ती पळून गेली. सासूच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बबली आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा नोंदवून शोध सुरु केलाय.
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी महिला पतीच्या हत्येच्या प्रकरणात सव्वापाच वर्ष तुरुंगात होती. तुरुंगातच तिचं प्रेम प्रकरण सुरु झालं. बाहेर आल्यावर तिने सासऱ्याची हत्या केली. एत्मादपुर क्षेत्रातील अगवार गावात राहणाऱ्या मुन्नी देवी यांनी बमरौली कटारा पोलीस ठाण्यात सूनेविरुद्ध तक्रार दिली. माझ्या सूनेने बबलीने तिचा प्रियकर प्रेम सिंह सोबत मिळून माझ्या नवऱ्याची राजवीरची गळा दाबून हत्या केली. नंतर मृतदेह बाजरीच्या शेतात फेकून दिला.
सुनेच असं वागणं पटत नव्हतं
मुन्नी देवीने सांगितलं की, बबली नवरा हरिओमच्या हत्या प्रकरणात सव्वापाच वर्ष तुरुंगात राहून आली होती. तुरुंगातच तिची ओळख प्रेम सिंह सोबत झाली. तिथे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रेम सिंहनेच बबलीचा जामीन केला. तुरूंगातून सुटल्यानंतर मागच्या एक वर्षापासून बबली महल बादशाही येथे प्रेम सिंह सोबत राहत होती. मुन्नी देवी म्हणाल्या की, माझे पती राजवीरना हे मान्य नव्हतं. ते बबलीला विरोध करायचे. प्रेम सिंह सोबत राहण्यावर त्यांना आक्षेप होता. म्हणून बबली आणि प्रेम सिंह दोघे त्यांना मार्गातून हटवणाची वाट पाहत होते.
बाजरीच्या शेतात नेलं
बबली सासरे राजवीर यांना आपल्यासोबत महल बादशाही येथे घेऊन गेली. बुधवारी रात्री राजवीर यांना बाजरीच्या शेतात नेऊन दोघांनी त्यांची हत्या केली. राजवीर यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिथे आले. फॉरेंसिक टीमने साक्ष नोंदवून घेतली. एसीपी अमरदीप यांनी सुद्धा घटनास्थळाच निरीक्षण केलं. बमरौली कटाराचे पोलीस अधिकारी हरीश शर्मा म्हणाले की, मृतकाच्या पत्नीने सून बबली व तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.
