सासूसोबत पळून गेलेल्या जावयाने पहिल्यांदा असं कांड केलेलं नाही, समोर आली नवीन धक्कादायक माहिती
सासू-जावई लव्ह स्टोरीच्या प्रकरणात आता एक नवीन वळण आलं आहे. राहुलच सपनाच्या 18 वर्षीय मुलीसोबत चार महिन्यापूर्वी लग्न ठरलं होतं. या प्रकरणात दोन नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये सासू-जावई लव्ह स्टोरीमध्ये आता नवीन खुलासा झाला आहे. होणाऱ्या सासूसोबत पळून गेलेल्या जावयाने याआधी सुद्धा असे कांड केले आहेत. मीडिया रिपोर्ट्नुसार जवळपास वर्षभरापूर्वी तो एका महिलेसोबत पळून गेला होता. अनेक दिवसानंतर ते परतले होते. बदनामीच्या भितीने कोणी याबद्दल पोलीस स्थानकात तक्रार केली नव्हती. महिला शेजारच्या गावात राहणारी होती. पोलीस, सासू आणि जावयाचा शोध घेत आहेत.
सासू सपना आणि होणाऱ्या जावयाचा पोलीस शोध घेत आहेत. सपनाचा नवरा जितेंद्रने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. सपना घरातून लाखो रुपये कॅश आणि दागिने घेऊन पळाली असं नवऱ्याचा आरोप आहे. आता पत्नीशी काही संबंध नाहीय. दुसरीकडे राहुलचे नातेवाईक आणि गावातले लोक यामध्ये सपनाचा दोष मानत आहेत.
एका नातेवाईकाला ताब्यात घेतलं
सासू आणि जावयाच्या लव्ह स्टोरीमध्ये आता नवनवीन अँगल समोर येत आहेत. दोघांना पळवण्यात राहुलच्या मित्राची भूमिका आहे, असं तपासातून समोर आलय. पोलिसांनी राहुलच्या एका नातेवाईकाला ताब्यात घेतलं आहे. राहुल वर्षभरापूर्वी शेजारच्या गावातील एका महिलेला घेऊन पळून गेला होता. आता तो होणाऱ्या सासूसोबत पळून गेलाय. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.
किती लाखाची कॅश आणि किती लाखाचे दागिने घेऊन पळाली?
राहुलच सपनाच्या 18 वर्षीय मुलीसोबत चार महिन्यापूर्वी लग्न ठरलं होतं. 16 एप्रिलला दोघांच लग्न होणार होतं. त्यासाठी कार्डही छापण्यात आले होते. त्याचवेळी राहुलची होणाऱ्या सासूसोबत जवळीक वाढू लागली. दोघे तासनातास मोबाइलवर बोलत बसायचे. 6 एप्रिलला राहुल होणाऱ्या सासूला घेऊन पळून गेला. सपनाचा नवरा जितेंद्रने या प्रकरणात पोलीसात गुन्हा नोंदवला. सपना साडेपाच लाखाचे दागिने आणि साडेतीन लाख रुपये कॅश घेऊन पळाली.
