अल्पवयीन मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली, महिलेला अटक

| Updated on: Aug 11, 2021 | 11:27 AM

पीडित अल्पवयीन मुलगा आरोपी नेहाच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेला होता. यावेळी तिने त्याच्यासोबत अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली.

अल्पवयीन मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली, महिलेला अटक
धक्कादायक ! चालत्या लोकलमध्ये दरोडा; महिलेचा फोन आणि पर्स घेऊन आरोपी फरार
Follow us on

लखनौ : अल्पवयीन मुलाशी छेडछाड केल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. बालकाच्या लैंगिक अवयवावर लाथ मारुन दुखापत केल्याचा महिलेवर आरोप आहे. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे उलट बालकाविरोधातच तक्रार करण्याचा पवित्रा महिलेने पोलीस स्टेशनला जाऊन घेतला. मात्र आयजींनी बेड्या ठोकून तिची रवानगी तुरुंगात केली.

नेमकं काय घडलं?

पीडित अल्पवयीन मुलगा आरोपी नेहाच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेला होता. यावेळी तिने त्याच्यासोबत अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली. त्यामुळे मुलाला गंभीर दुखापत झाली, असा आरोप आहे. त्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी नेहाविरोधात छेडछाड आणि अन्य कलमांच्या अंतर्गत तक्रार नोंदवली. पोलीस या प्रकरणात नेहाची चौकशी करणार होते.

आयजींनी महिलेचा बनाव ओळखला

नेहा लखनौ ग्रामीणमधील मलिहाबाद पोलीस ठाण्यात गेली. यावेळी तिने अल्पवयीन मुलानेच आपल्याला मारहाण आणि धमकी दिल्याचा आरोप केला. मात्र आयजी लक्ष्मी सिंह यांनी तिचा होरा ओळखून तिच्या मुसक्या आवळल्या. पोलीस या प्रकरणात पुढील कारवाई करत आहेत.

नवी मुंबईत छेडछाडीवरुन कोयता हल्ला

दरम्यान, नवी मुंबईत दोन कुटुंबांमध्ये सुरु असलेल्या वादाचे रुपांतर खुनी हल्ल्यात झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. कोपरी गावात तिघा जणांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. यामध्ये बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले. छेड काढल्याची तक्रार पोलिसात केल्यावरुन दोन कुटुंबांमध्ये वाद सुरु झाला. त्यातूनच हा कोयता हल्ला झाल्याची माहिती आहे.

दिल्लीत पत्रकाराची हत्या

गेल्या वर्षी भाचीशी छेडछाड केल्याची पोलिसात तक्रार केल्याने दिल्लीत पत्रकार विक्रम जोशी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. जोशींना त्यांच्या मुलींच्या डोळ्यादेखत गोळी घालण्यात आली होती. आपल्या भाचीशी छेडछाड केल्याची तक्रार विक्रम जोशी यांनी पोलिसांकडे दिली होती. याचा सूड घेण्यासाठीच गुंडांनी हल्ला केला होता.

संबंधित बातम्या :

मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाईन असलेल्या महिलेचा विनयभंग; वैद्यकीय कर्मचाऱ्याला अटक

मॉलबाहेर पोलिसाचा दाम्पत्यावर गोळीबार, व्हायरल व्हिडीओमागील सत्य काय?