पुरुषांना देह व्यापार करण्याचं आमिष दाखवून लूट, तिघांची टोळी जेरबंद

या टोळीचे सदस्य फोन करुन पुरुषांना जिगोलो होण्याची लालूच दाखवत असत. मजा-मस्तीसोबतच तगडी कमाई करण्याचं आश्वासन तरुणांना दिलं जाई. अशाप्रकारे त्यांनी डझनभर लोकांना चुना लावल्याचा संशय आहे.

पुरुषांना देह व्यापार करण्याचं आमिष दाखवून लूट, तिघांची टोळी जेरबंद
अटकेचा प्रातिनिधिक फोटो

लखनौ : जिगोलो (gigolo) म्हणजेच पुरुषांना देह व्यापार करण्याचं आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील आग्य्रात डझनभर तरुणांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. देह विक्रीसोबतच नोकरी आणि बँक कर्जाचं आमिषही आरोपी दाखवत असत. आग्र्याच्या सदर ठाणा पोलिसांनी सायबर टीमच्या सहाय्याने तिघांना बेड्या ठोकल्या.

काय होती मोडस ऑपरेंडी

या टोळीचे सदस्य फोन करुन पुरुषांना जिगोलो होण्याची लालूच दाखवत असत. मजा-मस्तीसोबतच तगडी कमाई करण्याचं आश्वासन तरुणांना दिलं जाई. आरोपी समोरच्याला बोलण्यात गुंतवून आपल्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगत. मात्र अकाऊण्टमध्ये पैसे येताच ते आपला फोन बंद करुन टाकत. अशाप्रकारे त्यांनी डझनभर लोकांना चुना लावल्याचा संशय आहे.

बँक मॅनेजरच्या तक्रारीने भांडाफोड

एका खासगी बँकेत मॅनेजर पदावर काम करणाऱ्या पीडित पुरुषाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने कारवाई करत टोळीतील सदस्य भोला कुमार (रा. बिहार), सोनू शर्मा आणि मुकेश कुमार (दोघेही रा. खेडा राठोड, आग्रा) यांच्या मुसक्या आवळल्या.

पेपरमध्ये जाहिरात देऊन फसवणूक

पोलिसांनी तिघांकडून बनावट ओळखपत्र, कर्ज मान्यता देणारी खोटी कागदपत्र, मोबाईल फोन असा ऐवज जप्त केला आहे. टोळीतील आणखी सदस्यांचा शोधही पोलीस घेत आहेत. कमी दरात कर्ज, स्पा सेंटरच्या नावावर लोकांची लुबाडणूक केली. आधी पेपरमध्ये जाहिरात दिली जायची, मग फोन करणाऱ्या लोकांकडून 5 ते 35 हजार रुपये वसूल केले जायचे. मात्र अकाऊण्टमध्ये पैसे येताच फोन बंद करुन आपण पसार व्हायचो, अशी कबुली भोलाने दिली.

संबंधित बातम्या :

अंधेरीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघींची सुटका, तिघांना अटक

नालासोपाऱ्यातील चाळीत वेश्या व्यवसाय, महिलेसह तृतीयपंथीयाला बेड्या, दोन लाखांचे कंडोम सापडले

पुण्यात बनावट ग्राहक पाठवून लॉजवर छापा, देह व्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघींची सुटका

Published On - 10:25 am, Wed, 11 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI