‘सॉरी, मी आता अजून जगू शकत नाही, त्यांनी मला…’, ज्योतीची शेवटची चिठ्ठी वाचून डोळ्यात येईल पाणी
“माझी इच्छा आहे की, त्यांनी जेलमध्ये जावं. त्यांनी माझा मानसिक छळ केलाय. माझा अपमान केलाय. त्यांच्यामुळे मी दीर्घकाळापासून डिप्रेशनमध्ये आहे. माझी इच्छा आहे की, त्यांनी सुद्धा ते सर्व सहन करावं. सॉरी, मी आता आणखी जगू शकत नाही”

शारदा यूनिवर्सिटीची विद्यार्थीनी ज्योतीने चिठ्ठीत लिहिलेले अखेरचे शब्द वाचून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. जीवन संपवण्यापूर्वी ज्योतीने लिहिलेली ही शेवटची चिठ्ठी आहे. तिने त्यात तिला होणारा त्रास, दु:ख याबद्दल लिहिलं आहे. या घटनेने संपूर्ण देश सून्न झालाय. उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामधील हे प्रकरण आहे. ‘सॉरी, मी आता अजून जगू शकत नाही, त्यांनी मला मानसिक दृष्ट्या त्रास दिलाय. मला अपमानित केलय. त्यांच्यामुळे मी बऱ्याच काळपासून डिप्रेशनमध्ये आहे” असं ज्योतीने चिठ्ठीत लिहिलं होतं. तिने हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं.
गुरुग्रामच्या अशोक विहारमध्ये राहणारी ज्योति ग्रेटर नोएडाच्या शारदा यूनिवर्सिटी बीडीएस सेकंड इयरची विद्यार्थीनी होती. शुक्रवारी तिने मंडेला गर्ल्स हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं. सोबत एक सुसाइड नोटही लिहिली. ज्योतीने दोन प्रोफेसरना तिच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलय. आता या प्रकरणात त्या दोन्ही प्रोफेसर्सना सस्पेंड करण्यात आलय. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहे.
‘माझी इच्छा आहे की, त्यांनी सुद्धा ते सर्व सहन करावं’
सुसाइड नोटमध्ये ज्योतीने लिहिलय की, “जर माझा मृत्यू झाला, तर त्याला PCP आणि डेंटल मेडिकलचे टीचर जबाबदार असतील. महेंद्र सर आणि शैरी मॅडम माझ्या मृत्यूला जबाबदार असतील” “माझी इच्छा आहे की, त्यांनी जेलमध्ये जावं. त्यांनी माझा मानसिक छळ केलाय. माझा अपमान केलाय. त्यांच्यामुळे मी दीर्घकाळापासून डिप्रेशनमध्ये आहे. माझी इच्छा आहे की, त्यांनी सुद्धा ते सर्व सहन करावं. सॉरी, मी आता आणखी जगू शकत नाही” असं ज्योतीने चिठ्ठीत लिहिलेलं. ज्योतीच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांनी प्रदर्शन करुन न्याय देण्याची मागणी केली. या दरम्यान पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचबाची, झडप झाली.
दोनवेळा धक्का दिल्यानंतर दरवाजा उघडला
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ज्योती खोलीतून एकटी बाहेर पडली. सोबत राहणाऱ्या विद्यार्थीनी बाहेर गेल्या होत्या. संध्याकाळी 7 वाजता एक विद्यार्थीनी आली. तिने पाहिलं तेव्हा, खोलीचा दरवाजा आतून बंद होता. विद्यार्थीनीने सांगितलं की, तिने दोनवेळा धक्का दिल्यानंतर दरवाजा उघडला. समोर पाहिलं तेव्हा ज्योतीने स्वत:ला फास लावून घेतलेला. वॉर्डन आणि अन्य विद्यार्थ्यांना याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सांगितलं की, ज्योतीवर एक खोटी सही केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे ती खूप त्रस्त होती. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस तिला PCP (प्री क्लिनिकल प्रोस्थोडॉट) डिपार्टमेंटमधून पळवून लावण्यात आलं. फाइल HOD कडे देण्यात आली होती.
शुक्रवारी संध्याकाळी ती भरपूर रडत होती
HOD ने तिला सांगितलेलं की, तुझ्या पालकांना बोलवं. तू फाइलवर स्वत: सही केलीस. सोमवारी तिचे आई-वडिल आले. त्यावेळी ज्योतीला तिची फाईल परत मिळाली. शुक्रवारी संध्याकाळी ती भरपूर रडत होती. तिला फेल करण्याची धमकी दिली जात होती.
