पत्नी पतीला विष देणार होती, पण गेम असा फिरला की, पत्नीलाच ते विष प्यावं लागलं, नेमकं काय घडलं?
अनैतिक संबंधांच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पुतण्याच्या प्रेमासाठी पत्नी पतीला विष देऊन मारणार होती. पण गेम असा फिरला की पत्नीलाच ते विष प्यावं लागलं. नेमकं काय घडलं?

हनीमूनवर पतीची हत्या, निळ्या ड्रममध्ये भरला मृतदेह, प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, अनैतिक संबंधांसाठी पतीला विष दिलं. मागच्या काही दिवसांपासून अशा बातम्या सातत्याने येत आहेत. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये असच एक प्रकरण समोर आलय. जिथे पत्नी पतीला विष देऊन मारणार होती, पण त्याआधीच असं काही झालं की, सगळा प्लानच बदलला. कानपूरच्या नवाबगंज गंगा बैराजच हे प्रकरण आहे. पोस्टमार्टम हाऊसमध्ये पत्नीच्या कुटुंबीयांनी तिच्या हत्येचा आरोप नवऱ्यावर केला. या आरोपानंतर पती खवळला. त्याने सर्व सत्य पत्नीच्या नातेवाईकांना सांगितलं.
मृत महिलेच सत्य जेव्हा तिच्या कुटुंबियांना समजलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पतीने आरोप लावला की, त्याच्या हत्येसाठी पत्नी विष घेऊन आली होती. दोघा पती-पत्नीच हे दुसरं लग्न होतं. वर्षभरापूर्वी एका प्रकरणात नवरा तुरुंगात होता. दोन महिन्यापूर्वी जामिनावर सुटून तो बाहेर आलेला. त्यानंतर त्याने पत्नीच्या हालचालींवर, वर्तनावर लक्ष ठेवायला सुरुवात केली.
मोबाइल चेक करायला विरोध
त्यावेळी पत्नीची त्याच्या पुतण्यासोबत जवळीक वाढत चालल्याच त्याच्या लक्षात आलं. पतीच्या म्हणण्यानुसार, एकदिवस त्याने दोघांना अनैतिकसंबंध ठेवताना रंगेहाथ पकडलं. ज्यावेळी त्याने विरोध केला, तेव्हा पत्नी आणि पुतण्याने मिळून त्याला मार्गातून हटवण्याच कट रचला. त्याला विष देऊन मारण्याचा प्लान होता. सोमवारी पत्नी मेडिकल स्टोरमधून विषारी पदार्थ घेऊन आली होती. त्याचदिवशी त्याने पत्नीचा मोबाइल चेक करण्याचा प्रयत्न केला. पण पत्नी विरोध करत होती.
मोबाइलमध्ये असं काय होतं?
पतीने पत्नीचा मोबाइल हिसकावला. त्यात पुतण्या आणि पत्नीचे अनेक अश्लील व्हिडिओ, फोटो मिळाले. त्यावर वाद वाढला. त्यानंतर पत्नीने जे विष नवऱ्याला मारण्यासाठी आणलेलं ते स्वत: प्याली. कुटुंबीय तिला लगेच हॅलेट रुग्णालयात घेऊन गेले. पण उपचारादरम्यान शनिवारी तिचा मृत्यू झाला. नवाबगंज पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पुतण्या आणि सासरच्या पाच जणांविरोधात हुंडा आणि हत्येची तक्रार दिली आहे.
