जेलमधून बाहेर आल्यावर बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला जंगलात बोलावलं, तिथे असं घडलं जे कोणालाच वाटलं नव्हतं
युवतीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामुळे तो तुरुंगात बंद होता. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने गर्लफ्रेंडला जंगलात भेटायला बोलावलं, तिथे असं घडलं जे कोणालाच वाटलं नव्हतं

उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये रोमियो- जूलिएट, हीर-रांझा आणि सोनी-महिवाल सारखी लव्ह स्टोरी समोर आली आहे. प्रेमी युगलाला एकमेकापासून तोडण्याचे कुटुंबियांनी भरपूर प्रयत्न केले. पण ते दोघांना वेगळे करु शकले नाहीत. मुलाला तुरुंगात सुद्धा टाकलं. पण तो तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर असं काही घडलं की, दोन्ही घर दु:खात बुडाली आहेत. दोघांनी विष पिऊन जीवन संपवलं. नानौतामधील हुसैनपुर गावची घटना आहे. इथे जंगलात ऊसाच्या शेतात युवक-युवतीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. दोघांच्या मृतदेहाजवळ सल्फासच पॅकेट पडलेलं होतं. मंगळवारी संध्याकाळी अंकित पुत्र श्याम यांच्या शेतात काला पुत्र सिमरू सिंचन करत होता. त्यावेळी त्याची नजर शेतात पडलेल्या युवक-युवतीच्या मृतदेहावर गेली.
दोन्ही मृतदेहांची ओळख पटली आहे. विनय पुत्र रत्न सिंह असं युवकाच नाव असून तो 26 वर्षांचा होता. नीलम पुत्री लोकेश असं मुलीच नाव असून ती 20 वर्षांची होती. तात्काळ या बद्दल पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसासह आलेल्या फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरुन मोबाइलसह विषारी पदार्थांचे रिकामी पाकिटं ताब्यात घेतली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठवले.
काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आलेला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसैनपुर गावाच्या जंगलात असलेल्या शेतात दोन मृतदेह मिळाले आहेत. प्राथमिक दृष्ट्या दोघांनी विषारी पदार्थांच सेवन करुन आत्महत्या केल्याच समोर आलं आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. युवक याआधी सुद्धा युवतीला एकदा पळवून घेऊन गेला होता. मुलावर दोन वर्षांपूर्वी युवतीला पळवून घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला होता. युवतीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन त्याच्या विरोधात रामपूर मनिहारान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामुळे तो तुरुंगात बंद होता. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्यानंतर पुन्हा दोघे बेपत्ता झालेले.
