AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन मुलीवर बापासह 28 जणांचा बलात्कार, आता आई म्हणते माझ्यासोबतही अपहरण करुन लग्न

बलात्कार पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, पतीने तिच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिला तिच्या सासरच्या लोकांसह घरगुती हिंसाचाराचा बळी बनवले. महिलेने पती आणि सासरच्या लोकांसह 11 लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

अल्पवयीन मुलीवर बापासह 28 जणांचा बलात्कार, आता आई म्हणते माझ्यासोबतही अपहरण करुन लग्न
प्रातिनिधीक फोटो
Updated on: Oct 15, 2021 | 3:32 PM
Share

लखनौ : गेली काही वर्ष आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर 28 जणांच्या साथीने बलात्कार करणाऱ्या पित्याच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधील एका 17 वर्षीय मुलीने समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) नेत्यांसह तिच्या वडिलांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याच्या दोन दिवसानंतर तिच्या आईने आता आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पीडितेच्या आईचा आरोप काय

बलात्कार पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, पतीने तिच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिला तिच्या सासरच्या लोकांसह घरगुती हिंसाचाराचा बळी बनवले. महिलेने पती आणि सासरच्या लोकांसह 11 लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, 2003 मध्ये आरोपीने तिच्या आई-वडिलांना अंमली पदार्थ देऊन घरातून तिचे अपहरण केले होते. त्याने तिचे सोन्याचे दागिनेही घेतले होते. नंतर महिलेला जबलपूर येथे नेण्यात आले, जिथे त्याच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत आर्य समाज मंदिरात तिचे जबरदस्तीने लग्न केले गेले.

पती-सासूसह अनेकांवर गुन्हा

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महिलेचा पती, नणंद आणि सासूसह अनेक जणांवर घरगुती हिंसाचार कायद्याव्यतिरिक्त भादंविच्या कलम 498 ए, 366, 323, 506, 326, 377 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, पोलिसांनी एफआयआरच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आलेल्या 200 बसपा आणि 250 सपा कार्यकर्त्यांविरोधात दोन एफआयआर देखील नोंदवले आहेत.

मुलीच्या जन्मानंतरही अत्याचार

महिलेने दावा केला की, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तिच्या पतीने तिला सतत मारहाण आणि अत्याचार केले. गर्भवती झाल्यानंतर तिला गर्भपात करण्यास सांगितले गेले, पण जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिला जेवण देणे बंद केले. शेजारी तिला जेवण द्यायचे, ज्यामुळे तिचा जीव कसाबसा वाचला. मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यात आले.

आईला जीवे मारण्याचा प्रयत्न

बलात्कार पीडितेच्या आईने दावा केला की जेव्हा ती पुन्हा गर्भवती झाली, तेव्हा तिच्या पतीने तिच्या प्रायव्हेट पार्टला इजा करण्याचा प्रयत्न केला. तिच्या सासरच्या लोकांनी तिला रॉकेल पिऊन, विष देऊन आणि अॅसिड फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी ती वाचली. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिचा पती आपल्या मुलीला शाळेनंतर अनेक ठिकाणी घेऊन गेला आणि तिला विकण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर बलात्कार केला.

संबंधित बातम्या :

आईचा खून करुन मृतदेह झुडपात टाकला, बार्शीचा नराधम मुलगा रत्नागिरीत कसा सापडला?

खतरनाक ! आई झुम मिटींगवर, पोराच्या हाती बापाची पिस्टल लागली मग काय डॅण्टॅडॅणsssss

फारकत घेतलेल्या बायकोच्या हत्येचा कट, कर्ज काढून 13 लाखांची सुपारी, पोलीसांचीही अफलातून खेळी, आरोपी जेरबंद

गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर
गावात कुत्रं विचारत नाही..;अविनाश जाधवांचं भाजप नेत्यांना खरमरीत उत्तर.
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?.
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले.
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार.
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी.
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका.