AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Hagvane Death : जसा अशील, तसा वकील… वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट उचलणाऱ्या वकिलाचे काळे कारनामे उघड

हगवणेंच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करून आणि नवऱ्याने मारहाण करणे हे कौटुंबिक हिंसाचार नाही असे म्हटले. मात्र त्याच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यात मोठा संताप निर्माण झाला आहे.

Vaishnavi Hagvane Death : जसा अशील, तसा वकील... वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट उचलणाऱ्या वकिलाचे काळे कारनामे उघड
वैष्णवी हगवणे मृत्यूImage Credit source: social media
| Updated on: May 29, 2025 | 12:20 PM
Share

पुण्यातील मुळशी जवळील गावात राहणाऱ्या वैष्णवी हगवणे या महेने 16 मे रोजी टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं आणि संपूर्ण राज्य हादरलं. हुंड्यासाठी सासरच्यांकडून अनन्वित छळ झालेल्या वैष्णवीची त्महत्या नसून खून झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. याप्रकरणी तिचा पती, नणंद, सासू, सासरे व दीर यांना पोलिसांनी अटक केली असून काल त्यांची पोलीस कोठडी संपल्याने कोर्टासमोर हजर करण्यात आलं. वैष्णीचा पती, सासू व नणंद यांची पोलीस कोठडी एका दिवसाने वाढवण्यात आली तर दीर व सासऱ्यांना 31 में पर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली. मात्र कोर्टातील युक्तिवादादरम्यान हगवणे यांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने जी विधानं केली, त्याने सगळेच संतापले आहेत.

वैष्णवी हगवणे प्रकरणी हगवणे कुटुंबाची बाजू मांडणारे वकील विपुल दुशिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी थेट वैष्णवीच्या चारित्र्यावरच बोट उचलत तिच्यावर नको नको ते आरोप केले. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी, दुशिंग यांनी केला असून त्यामुळे प्रचंड संताप निर्माण झाला आहे. वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू होतं , ते आम्ही आम्ही दाखवू शकतो, असं वकील दुशिंग म्हणाले होते.एवढंच नव्हे तर नवऱ्याने मारहाण करणे हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने सध्या या वकिलावर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात येत आहे.

वकिलाचे कारनामे समोर

दरम्यान मोठ्या व छोट्या सुनेला क्रर वागणूक देऊन छळणाऱ्या हगवणे कुटुंबाचे नवनवे कारनामे समोर येत असतानाच आता त्यांच्या वकिलाबाबतही अशीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. हगवणे कुटुंबाची बाजू कोर्टात मांडणारे वकील विपुल दुशिंग यांचं व्यक्तीमत्वही असच वादग्रस्त असून त्याच्यावर मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचं उघड झालंय.

मिळालेल्या माहितीनुसार, हगवणे कुटुंबाची बाजू मांडणाऱ्या विपुल दुशिंग या वकिलावर याआधी 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. वकिलाची कॉलर पकडून मारहाण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आणि गुन्हा दाखल कण्यात आला होता. वडगाव मावळ कोर्टात प्रेम कुमार अग्रवाल या वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला अशी माहिती समोर आली आहे. विपुल दुशिंग आणि त्यांच्या दोन सहकार्या विरोध वडगाव मावळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रोहिणी खडसे संतापल्या

नवऱ्याने मारहाण करणे हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही असं म्हणणाऱ्या वकिलावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे संतापल्या आहेत. त्यांनी एक ट्विट करतत्या वकिलावर टीका केली. ‘जो त्या वकिलाच्या कानशिलात लगावेल त्याचा मी सत्कार करेल…’ असं खुल आव्हान देत रोहिणी खडसे यांनी संतापाला वाट करून दिली.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.