AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: बुलडाण्यात भीषण अपघात, कारच्या धडकेत मुलगा रस्त्यावरुन उडाला, जगण्याशी झूंज

बुलडाणाच्या मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकारशा इथला 10 वर्षीय रुद्र बोराडे हा चिमुकला करवंड इथे गेला होता. त्यावेळी पॅसेंजर गाजीतून उतरल्यावर रस्त्या ओलांडताना भरधाव कारने त्याला धडक दिली. या धडकेत तो चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Video: बुलडाण्यात भीषण अपघात, कारच्या धडकेत मुलगा रस्त्यावरुन उडाला, जगण्याशी झूंज
बुलडाणा अपघात
| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 8:50 PM
Share

बुलडाणा : मेहकर तालुक्यातील (Mehkar Taluka) करवंडमधील एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीत (Accident CCTV Video) कैद झाली आहे. एक 10 वर्षाचा चिमुरडा कारखाली येता-येता वाचला आहे. मात्र. कारची जोरदार धडक बसल्यामुळे तो चिमुकला गंभीर जखमी (Child Injured) झाला आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपलाही थरकार उडाल्याशिवाय राहत नाही.

बुलडाणाच्या मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकारशा इथला 10 वर्षीय रुद्र बोराडे हा चिमुकला करवंड इथे गेला होता. त्यावेळी पॅसेंजर गाजीतून उतरल्यावर रस्त्या ओलांडताना भरधाव कारने त्याला धडक दिली. या धडकेत तो चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की कारने धडक दिल्यानंतर तो चिमुकला काही अंतरावर फेकला गेला.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

एक पॅसेंजर गाडी रस्त्याच्या कडेला येऊन थांबते. त्या गाडीचा ड्रायव्हर उतरून मागील दरवाजा उघडतो. त्यावेळी गाडीच्या मागून एक काळ्या रंगाची कार भरधाव वेगाने येत असल्याचं दिसतं. नेमकं त्याच वेळी एक चिमुकला त्या पॅसेंजर गाडीतून उतरतो आणि धावतच रस्त्या ओलांडण्याचा प्रयत्न करतो. मात्र भरधाव वेगात येणाऱ्या कारला त्या चिमुकल्याची एका बाजूने धडक बसते. त्यामुळे तो चिमुकला रस्त्याच्या एका बाजूला फेकला जातो. पॅसेंजर गाडीमधील अन्य प्रवाशांना काही कळायच्या आतच ती कार निघून जाते.

इतर बातम्या :

‘बेवड्यांना समर्पित सरकार’, मुनगंटीवारांचा हल्लाबोल; तर ‘सरकारला शेतकऱ्यांची नाही, बेवड्यांची काळजी’ दरेकरांचाही घणाघात

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.