हिंगणघाट जळीतकांड सुनावणी : आरोपीने प्राध्यापिकेला घटनेच्या दोन महिन्यापूर्वीही रस्त्यात होतं अडवलं

कॉलेजमधील विद्यार्थिनी आणि दरोडा येथील विद्यार्थिनींची साक्ष या खटल्यात निर्णायक आणि महत्त्वपूर्ण ठरु शकते, असा विश्वास अॅड उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला (Wardha Hinganghat Burnt case hearing)

हिंगणघाट जळीतकांड सुनावणी : आरोपीने प्राध्यापिकेला घटनेच्या दोन महिन्यापूर्वीही रस्त्यात होतं अडवलं
वर्धा हिंगणघाट जळीतकांड आरोपी विकी नगराळे

वर्धा : हिंगणघाटमधील प्राध्यापिका जळीत प्रकरणात आतापर्यंत 13 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. काल तपासण्यात आलेल्या साक्षी पुराव्यामध्ये हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला घटनेच्या दोन महिन्यापूर्वीही आरोपीने पीडितेला रस्त्यात अडवून विचारणा केल्याचे साक्षी पुराव्यात समोर आले आहे. सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. (Wardha Hinganghat Burnt case hearing Adv Ujjwal Nikam)

चार साक्षीदारांची उलट तपासणी

कॉलेजमधील विद्यार्थिनी आणि दरोडा येथील विद्यार्थिनींची साक्ष या खटल्यात निर्णायक आणि महत्त्वपूर्ण ठरु शकते, असा विश्वास अॅड उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला आहे. याच खटल्यात आरोपीच्या वकिलांनी चार साक्षीदारांची उलट तपासणी केली. तर एका साक्षीदाराची उलट तपासणी वेळेअभावी करणे शक्य झाले नाही, परंतु या सर्व साक्ष प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे त्याचा विशेष फरक पडणार नसल्याचे आरोपीचा वकील भूपेंद्र सोने यांनी सांगितले आहे.

खटला चालवताना बचाव पक्षाकडून सोने आरोपीची बाजू मांडत आहेत. आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या 13 साक्षीदारांनंतर पुन्हा सात ते आठ साक्षीदार या खटल्यात तपासले जाणार आहेत, त्यासाठी पुढील सुनावणी 20 मार्च रोजी होणार आहे.

कोणाकोणाची साक्ष?

सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी या प्रकरणातील पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. यामध्ये नागपूर येथील शवविच्छेदन करणारे डॉक्टर, हिंगणघाटमध्ये पीडितेवर प्राथमिक उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, पीडितेची मैत्रीण आणि पीडितेच्या महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनी यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. या खटल्यात आतापर्यंत 13 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. आता या खटल्याची पुढिल सुनावणी 20 मार्चला होणार आहे. तर 4 साक्षीदारांची उलटतपासणी केल्याची माहिती बचाव पक्षाचे वकील ॲड भूपेंद्र सोने यांनी दिली आहे.

निकालासाठी नागरिकांची गर्दी

कबुलीनामा ज्यांनी लिहिला आणि जप्ती पंचनामा करणाऱ्याची साक्ष महत्वाची ठरणार असल्याचे दोन्ही बाजूच्या वकिलांना वाटत असल्याचे दिसून येते. सुनावणीचा अखेरचा दिवस असल्याने न्यायालय परिसरात नागरिक होते. निकाल जाणून घेण्याची हिंगणघाट येथील नागरिकांना उत्सुकता होती.

हिंगणघाट येथील घटनेला काही दिवसांपूर्वी एक वर्ष झालं. कोरोनामुळे या घटनेचा खाटला हा थांबला होता. मागील महिन्यापासून सुनावणीला गती मिळाली असून लवकरच निकाल लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हिंगणघाट जळीतकांड काय आहे?

हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली पीडिता 3 फेब्रुवारीला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी ४० टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

कोण आहे विक्की नगराळे?

आरोपी विक्की नगराळे याचे लग्न झाले असून त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. या घटनेपूर्वी तीन महिन्यांपूर्वी त्याने पीडितेला त्रास दिला होता. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावले होते.

संबंधित बातम्या :

हिंगणघाटच्या पीडितेला राज्य सरकार विसरलं, दिशा कायद्याचं काय झालं, चित्रा वाघ यांचा सवाल

हिंगणघाट जळीतकांड खटल्याच्या सुनावणीला उद्यापासून सुरुवात: उज्ज्वल निकम करणार युक्तिवाद

(Wardha Hinganghat Burnt case hearing Adv Ujjwal Nikam)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI