Wardha : 70 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

Wardha : 70 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
70 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू
Image Credit source: tv9 marathi

महिलेचा मृतदेह वर्धा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे.अल्लीपूर पोलिसांनी आकास्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शविविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिस पुढील तपास करतील अशी माहिती मिळाली आहे.

चेतन व्यास

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 21, 2022 | 10:15 AM

वर्धा : वर्धा (Wardha) जिल्ह्याच्या अल्लीपूर येथे 70 वर्षीय वृद्ध महिलेचा घरातच मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. महिलेच्या घरातून दुर्गंधी येत होती, पाहणी केली असता महिलेचा मृ्त्यू झाल्याचे निदर्शनास आले. महिलेचा उष्माघाताने (Heatstroke) मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातं आहे. पण 70 वर्षीय महिलेचा अचानक मृ्त्यू झाल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. पोलिसांनी (Wardha Police) मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदन केल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल. तसेच पोलिस घराची झाडाझडती घेतली असून संशयास्पद काही गोष्टीची पाहणी देखील केली आहे.

उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जातं आहे

जनाबाई अलमारी पवार असं मृत महिलेच नाव आहे. अल्लीपूर येथील गोळोबा वॉर्डात ही महिला एका टीनाच्या झोपड्यात एकटी राहत होती. सदर महिला ही मागील दोन दिवसांपासून घराच्या बाहेर नागरिकांना निदर्शनास आली नव्हती. एवढंच नव्हे तर महिलेच्या घरातून दुर्गंधी सुद्धा येत होती. दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत घराचे दार उघडले असता महिला ही मृतावस्थेत आढळली. महिलेचा मृतदेह हा काळसर झाला असून तिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जातं आहे. महिलेचा मृतदेह वर्धा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे.अल्लीपूर पोलिसांनी आकास्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शविविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिस पुढील तपास करतील अशी माहिती मिळाली आहे.

उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जातं आहे

मागील दोन आठवड्यापासून वर्धा जिल्ह्याचे तापमान हे 45 अंशाच्या घरात आहे. वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम सुद्धा होत आहे. यामुळे येते काही दिवस नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यात सुध्दा उष्माघाताने आत्तापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने दुपारी आवश्यक काम असेल तरचं घरातून कामासाठी बाहेर पडा असं आवाहन केलं आहे.

हे सुद्धा वाचा

तसेच राज्यातील आरोग्य विभागाने बाहेर जाताना काळजी घ्यावी असा सल्ला नागरिकांना दिला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें