मुलींना पाहून अश्लील चाळे करायचा, जाब विचारण्यास गेलेल्या आईला मारहाण, भावाला थेट…
आरोपी आणि पीडित महिला शेजारी आहेत. आरोपी महिलेच्या अल्पवयीन मुलींना पाहून अश्लील हावभाव करायचा. याचा जाब विचारण्यासाठी महिला आरोपीकडे गेली असता त्यांच्यात वाद झाला.

भिवंडी : मुलींना पाहून अश्लील हावभाव केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेला शेजाऱ्याने मारहाण केल्याची घटना भिवंडी येथे उघडकीस आली आहे. आईचा आवाज ऐकून तिला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या मुलाची आरोपीने हत्या केली. यानंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीवर आयपीसीच्या विविध कलमांतर्गत हत्या आणि लैंगिक अत्याचार तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलिसांचे पथक फरार आरोपीचा शोध घेत आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी आणि पीडित महिला शेजारी आहेत. आरोपी महिलेच्या अल्पवयीन मुलींना पाहून अश्लील हावभाव करायचा. याचा जाब विचारण्यासाठी महिला आरोपीकडे गेली असता त्यांच्यात वाद झाला. तसेच आरोपीने महिलेला काठीने मारहाण करण्यास सुरवात केली.
महिलेचा आरडाओरडा ऐकून तिचा 17 वर्षाचा मुलगा तिला वाचवण्यासाठी मध्ये पडला. यावेळी आरोपीने चाकूने हल्ला करत महिलेच्या मुलाची हत्या केली. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. आरोपी भिवंडी तालुक्यातील करावली गावातील रहिवासी आहे.
याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
पालघरमध्ये मेव्हण्याकडून भावोजीची हत्या
बहिणीला नवरा त्रास देत असल्याच्या रागातून सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याचीच कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना मोखाडा तालुक्यात उघडकीस आली आहे. महेंद्र दामू भोईर असे मयत भावोजीचे नाव आहे. आरोपीने मयत महेंद्र याच्या मानेवर आणि डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याची निर्घृण हत्या केली.
