कलियुगातील भयानक आई… बाथरुममध्ये 4 मुलांचा जन्म… कपाटात आणि पोटमाळ्यावर सर्वांचे मृतदेह, स्वतःच्यात मुलांसोबत तिने केलं तरी काय?
Crime : आई आहे की हैवान..., स्वतःच्या 4 मुलांना संपवलं..., बाथरुममध्ये मुलांना जन्म दिल्यानंतर मुलांचे मृतदेह ठेवले कपाटात आणि पोटमाळ्यावर... काय आहे संपूर्ण प्रकरण घ्या जाणून... बसेल धक्का

Crime : आईसाठी तिची मुलं सर्वकाही असतात… मुलांसाठी आई अनेक मोठे त्याग करते. देव प्रत्येक ठिकाणी हजर राहू शकत नाही म्हणून त्याने आई – वडील देवाच्या जागेवर असतात… असं म्हणतात. पण एका ठिकाणी आईने स्वतःच्या एक दोन नाही तर, चक्क चार मुलांची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मुलांची हत्या केल्यानंतर महिलेने त्यांचे मृतदेह कपाटात आणि माळ्यावर ठेवले… आता याप्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहे…
ज्या महिलेने स्वतःच्या चार मुलांची हत्या केली त्या महिलेचं नाव जेसिका माउथे (Jessica Mauthe) असं आहे. जेसिका हिने स्वतःच्या 4 मुलांची हत्या केली आहे. जेसिकाच्या घरात एका कपाटात एका नवजात बाळाचा मृतदेह टॉवेल आणि कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये गुंडाळलेला आढळला. तिने आणखी तीन नवजात बाळांचे मृतदेह पोटमाळ्यावर लपवले होते.
नवजात मुलांच्या मृतदेहांसोबत राहत होती महिला…
जेसिकाच्या घरमालकाने तिला घराबाहेर काढण्याची नोटीस बजावली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. घरमालक तिच्या सामानाची तपासणी करण्यासाठी आला तेव्हा त्याला एका कपाटात टॉवेल आणि कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये गुंडाळलेल्या नवजात बाळाचा मृतदेह आढळला. त्याने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली. तेव्हा पोलिसांनी आणखी तीन मुलांचे मृतदेह आढळले. महिलेने मुलांचे मृतदेह बादल्यांमध्ये ठेवले होते.. जेव्हा जेसिका हिला न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा तिने सर्व आरोप फेटाळून लावले.
प्रत्येक मुलासाठी वेगवेगळे जबाब…
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, जेसिका हिने प्रत्येक बाळाबद्दल वेगवेगळं विधान केलं आणि सांगितलं की तिने बाथरूममध्ये सर्वांना जन्म दिला. पहिल्या मुलाबद्दल, तिने सांगितलं, तिला “एक मंद आवाज ऐकू आला, नंतर ती बेशुद्ध पडली. जेव्हा तिला शुद्धीवर आले तेव्हा ते मूल मृतावस्थेत होतं.”
दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलांबद्दल, जेसिका हिने सांगितलं, चौथ्या मुलाचा जन्म बाथरुममध्ये झाला आणि बाळ जिवंत होतं… काही मिनिटं जेसिका हिने बाळा घेतलं नाही… त्यानंतर तिने मुलाला टॉवेलमध्ये लपटलं… तिने मुलाला सुमारे 15 -20 मिनिटं आपल्या मांडीवर घेतलं, जोपर्यंत तो शांत होत नव्हता. तिने सांगितले की तिला माहित नाही की बाळाचा मृत्यू तिच्या पकडीमुळे झाला की त्याचं तोंड आणि नाक झाकलं गेलं होतं.
जेसिकाचे वकील चक पास्कल यांनी न्यायालयाला सांगितल्यानुसार, पोलिसांकडे कोणत्याही मुलांच्या मृत्यूचे पुरावे नाहीत, शवविच्छेदन अहवाल नाही आणि जन्मानंतर बाळे जिवंत असल्याचा कोणताही पुरावा नाही. वकिलाने असा युक्तिवाद केला की जेसिकाचं म्हणणं अविश्वसनीय होतं कारण ती रक्तक्षयग्रस्त होती, वेदनेने ग्रासलेली होती आणि मानसिकदृष्ट्या गोंधळलेली होती.
न्यायाधीश जे. गॅरी डीकोमो यांनी बचाव पक्षाचे युक्तिवाद फेटाळून लावले आणि सर्व आरोप कायम ठेवले. जेसिका हिला तुरुंगात टाकण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.
