AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबादेवी मंदिरात मराठी अभिनेत्याला असं काय दिसलं, ज्यामुळे म्हणाला, ‘यूपी-बिहारचा फिल आणि…’

Yashodhan Gadkari Video on Mumba devi Temple : 'मुंबई सर्वांना मुंबई सर्वांना सामावून घेतेय पण...', यूपी-बिहारवर निशाणा साधत मराठी अभिनेत्याने दाखवलं मुंबादेवी मंदिर परिसरातील वास्तव...

मुंबादेवी मंदिरात मराठी अभिनेत्याला असं काय दिसलं, ज्यामुळे म्हणाला, 'यूपी-बिहारचा फिल आणि...'
फाईल फोटो
| Updated on: Nov 01, 2025 | 9:41 AM
Share

Yashodhan Gadkari Video on Mumba devi Temple : मुंबई परप्रांतीयांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली असून, अनेक ठिकाणी त्याचा प्रत्येय येत आहे. आता देखील असंच काही झालं आहे. मराठी अभिनेते यशोधन गडकरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी मुंबईतील मुंबादेवी मंदिरातील सध्याची स्थिती दाखवली… सध्या त्यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय अनेकांना व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

यशोधन गडकरी यांनी मंदिराच्या परिसरातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेते म्हणाले, ‘मुंबादेवी ही मुळची मराठी, आग्री आणि कोळी बांधवांची… पण याठिकाणी आल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली… मुंबई सर्वांना सामावून घेते असं म्हणतात आणि मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबई असं नाव पडलं…’

कोणती गोष्ट अभिनेत्याला मंदिराच्या परिसरात जाणवली

‘कर्नाटकातील मंदिरात गेल्यानंतर आपल्याला कर्नाटकात आल्यासारखं वाटतं, गुजरातमधील मंदिरात गेल्यानंतर गुजरात येथे आल्यासारखं वाटतं… त्याचप्रमाणे युपी आणि बिहार येथे गेल्यानंतर आपल्याला तेथील अनुभव येतो… वैष्णो देवीला गेल्यानंतर तिकडे गेल्याचा फिल येतो…’

‘पण याठिकाणी मंदिर परिसरात मराठीपण राहिलंय असं मला बिलकुलच वाटत नाही.. त्यामागे कारण देखील तसं आहे. पूजा साहित्य विकरणारे सगळे विक्रेते बऱ्यापैकी अमराठी दिसत आहे… मराठी माणसं हाताच्या बोटावर मोजण्यासारखी आहेत… शिवाय वैष्णो देवीला मिळत असलेलं सामान येथे मिळत आहे. आपल्या पद्धतीतल्या ओट्या दिसत नाहीत… येथे ओट्या आणि पूजेचं साहित्य दिसायला हवं… असं मला वाटतं…’

‘शेवटी समरसता आहे ही येऊ घातलेली. मुंबई सर्वांना सामावून घेतेय पण, सामावून घेत असताना मराठी माणूस कुठे आहे याचा प्रत्येकाने विचार करायचा. वाद घालण्यापेक्षा विचार केलेला जास्त बरा…’ असं देखील अभिनेते यशोधन गडकरी म्हणाले आहे. सध्या त्यांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.