डेंजर बायको! नवरा, मुलं, सासू-सासऱ्यांना रोज द्यायची स्लो पॉइजन, कशी झाली पोलखोल; सर्वांनाच फुटला घाम
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. तिने स्वत:ची मुले, नवरा आणि सासू-सासऱ्यांना थेट मारण्याचा कट रचला होता. हे प्रकरण कसं उघडकीस आले? चला जाणून घेऊया...

कर्नाटक या दक्षिण भारतीय राज्यातून एक चकित करणारी घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने आपल्या पती, मुलं, सासू आणि सासऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. यासाठी ती त्यांना हळूहळू विष देत होती, कारण हे सर्वजण तिच्या अवैध संबंधांच्या मार्गातील अडथळे ठरत होते. ही बाब उघडकीस तेव्हा आली, जेव्हा पतीला तिच्या बॅगेत काही गोळ्या सापडल्या. पतीने या गोळ्या डॉक्टरकडे नेल्या, तेव्हा डॉक्टरने सांगितले की या गोळ्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत.
आता आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिची ओळख चैत्रा (वय 33) अशी आहे. ही संपूर्ण घटना कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील बेलुरू तालुक्यातील केरलूर गावातील आहे. सांगितले जाते की, चैत्रा आणि गजेंद्र यांचा विवाह होऊन 10 वर्षे झाली आहेत. या दाम्पत्याला दोन गोड मुले आहेत. गेल्या काही काळापासून चैत्रा फोनवर खूप जास्त बोलत होती, त्यामुळे पती गजेंद्रला संशय आला. त्याने तपास केला तेव्हा त्याला कळले की, चैत्राचे एका मुलाशी प्रेमसंबंध आहेत.
काही महिन्यांनंतर शेजाऱ्यासोबत सुरू झाले प्रेमसंबंध
गजेंद्रने तातडीने चैत्राच्या घरच्यांना याबाबत सांगितले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी एकत्र बसून चर्चा करुन दोघांना समोरासमोर बसवले. तेव्हा चैत्राने सांगितले की, तिच्याकडून चूक झाली आणि ती पुन्हा असे करणार नाही. मुलांच्या भविष्यासाठी गजेंद्रने आपल्या पत्नी चैत्रासोबत पुन्हा राहण्यास सहमती दर्शवली. पण काही महिन्यांनंतर चैत्राचा शेजारी असलेल्या शिवू नावाच्या व्यक्तीशी मैत्री झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले.
पत्नीने पतीशी केला वाद
गजेंद्रला याबाबत कळताच त्याने चैत्राला विचारणा केली. तेव्हा चैत्राने गोंधळ घातला होता. शिवूने मागील वर्षी गजेंद्रविरुद्ध तक्रार दाखल करून त्याला तुरुंगात पाठवले होते. अचानक गजेंद्रला आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या. त्याला थकवा, सुस्ती, निद्रानाश आणि जास्त झोप येणे यासारख्या समस्या जाणवू लागल्या. याशिवाय इतरही अनेक त्रास होऊ लागले. गजेंद्रला काय झाले याबाबत तो चिंतेत होता. दरम्यान, चैत्राने त्याच्याशी भांडणे सुरू केली आणि माहेरी जाण्याचा निर्णय घेतला.
हत्या करण्याचा कट रचला
या दरम्यान गजेंद्रने चैत्राच्या बॅगेची तपासणी केली, तेव्हा त्याला तिच्या बॅगेत मोबाईल फोन आणि काही गोळ्या सापडल्या. गजेंद्र या गोळ्या घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने त्याला सांगितले की, या गोळ्या आरोग्यासाठी योग्य नाहीत, त्या विषारी गोळ्या आहेत. खरे तर, चैत्रा गेल्या काही महिन्यांपासून गजेंद्र, त्यांच्या मुलांना, सासू आणि सासऱ्यांना हळूहळू या गोळ्या देत होती. तिने या पाचही जणांच्या हत्येचा कट रचला होता. यानंतर तातडीने सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बेलूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून चैत्राला हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तिच्या प्रियकराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
