तीन वेळा लग्न केलं, तीनही वेळा संसार मोडून माहेरी परतली, पित्याने घरात घेण्यास विरोध करताच जन्मदात्याची हत्या, बुलडाणा हादरलं

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी मुलीचं वेगवेगळ्या व्यक्तींसोबत तीन वेळा लग्न लावून दिलं. पण तीनही वेळा ती सासरी नांदली नाही.

तीन वेळा लग्न केलं, तीनही वेळा संसार मोडून माहेरी परतली, पित्याने घरात घेण्यास विरोध करताच जन्मदात्याची हत्या, बुलडाणा हादरलं
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 12:28 AM

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी मुलीचं वेगवेगळ्या व्यक्तींसोबत तीन वेळा लग्न लावून दिलं. पण तीनही वेळा ती सासरी नांदली नाही. ती तिसऱ्यांदा जेव्हा संसार मोडून घरी आली तेव्हा तिच्या पित्याने तिला घरात घेण्यास नकार दिला. यावळी मुलीने आपल्या चुलत भावाच्या मदतीने जन्मदात्या वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण मलकापूर शहर हादरलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगी आणि तिच्या चुलत भावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही मलकापूर शहरातील सुभाषचंद्र बोस नगर परिसरात घडली आहे. मृतक 52 वर्षीय गुलाब रावणचवरे यांनी आपल्या लक्ष्मी नावाच्या मुलीचं तीनवेळा लग्न करुन दिलं. पण मुलगी तरीही संसार करत नसल्याने गुलाब नेहमी तिच्यावर रागवत होते. यादरम्यान लक्ष्मी बुधवारी तिच्या अमरावतीच्या फुल माला येथील सासर सोडून पुन्हा वडिलांच्या घरी आली. त्यामुळे वडील तिच्यावर प्रचंड भडकले. यावरुन दोघांमध्ये मोठा वाद झाला.

लक्ष्मीचा वडिलांवर हल्ला

यावेळी लक्ष्मी किचनमधील लोखंडी सुरी घेऊन वडिलांच्या अंगावर धावत गेली. याच दरम्यान तिचा चुलत भाऊ प्रकाश साहेबराव रावणचवरे याने लक्ष्मीच्या हातातील सुरी स्वतःकडे घेऊन सख्खे काका गुलाब रावणचवरे यांच्या छातीत खुपसली. या हल्ल्यात गुलाब प्रचंड रक्तबंबाळ झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

आरोपींना अटक, खुनाचा गुन्हा दाखल

संबंधित घटनेनंतर घरात मोठा गदारोळ झाला. या गदारोळाचा आवाज ऐकून शेजारचे नागरिक घरात आले. तेव्हा हा सर्वप्रकार त्यांच्यादेखील लक्षात आला. दुसरीकडे मृतक गुलाब यांच्या लहान 12 वर्षीय चिमुकलीने यावेळी प्रचंड आक्रोश केला. संबंधित घटनेची कुणीतरी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच आरोपी लक्ष्मी आणि तिच्या चुलत भावाला ताब्यात घेतलं. गुलाब यांच्या 12 वर्षीय मुलीने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. तसेच त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिल्लीत मुलाकडून आईची हत्या

दुसरीकडे दिल्लीत मुलाकडूनच आईची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. विशेष म्हणजे महिलेच्या मृतदेहाजवळ जिवंत काडतूसे आणि गावठी कट्टा (पिस्तूल) आढळले होते. महिलेच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या महिलेच्या हत्येमागे नेमका कुणाचा हात होता, याचा तपास पोलीस गेल्या आठ दिवसांपासून करत होते. अखेर महिलेच्या मुलानेच तिची हत्या केल्याचं उघड झालं आहे. संबंधित घटना उघड झाल्यानंतर मुलगा आपल्या जन्मदाती आईची हत्या कशी करु शकतो? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

महिलेची रुग्णालयात सहा दिवस मृत्यूशी झुंज

संबंधित घटना ही 1 सप्टेंबरला दिल्लीतील मुंडका पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. आरोपी मुलाने आईच्या डोक्यात गोळी झाडली होती. ही गोळी महिलेच्या गळ्याला लागली. महिला प्रचंड जखमी झाली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. रक्तबंबाळ महिलेच्या विव्हळण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. तसेच महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था करण्यात आली. महिलेने रुग्णालयात जवळपास सहा दिवस मृत्यूशी झुंज दिली. पण 6 सप्टेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा :

प्रियकरासोबत वारंवार वाद, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि मारहाण, विवाहितेचं टोकाचं पाऊल, पिंपरी चिंचवड हादरलं

पुणे जिल्ह्यात आठवड्याभरातील तिसरी भीषण घटना, 13 वर्षीय चिमुकलीवर चार जणांकडून वारंवार बलात्कार

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.