AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुपारी समजून महिलेने पकडली वस्तू, भीषण स्फोटानंतर बोटाच्या चिंधड्या, गावठी बॉम्ब असल्याचा संशय

सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने सुपारी समजून गावठी बॉम्बसदृश वस्तू हातामध्ये घेतल्यामुळे चांगलाच स्फोट झाला आहे. लक्ष्मी सखाराम देवळी असं या महिलेचं नाव असून त्या या स्फोटात जमखी झाल्या आहेत.

सुपारी समजून महिलेने पकडली वस्तू, भीषण स्फोटानंतर बोटाच्या चिंधड्या, गावठी बॉम्ब असल्याचा संशय
sindhudurg bomb
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 8:22 PM
Share

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने सुपारी समजून गावठी बॉम्बसदृश वस्तू हातामध्ये घेतल्यामुळे चांगलाच स्फोट झाला आहे. लक्ष्मी सखाराम देवळी असं या महिलेचं नाव असून त्या या स्फोटात जमखी झाल्या आहेत. त्यांच्या हाताची बोटे तुटून बाजूला पडली आहेत.

सुपारी समजून अडकित्त्याने फोडण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी सखाराम देवळी या सावंतवाडी येथील ओटवणे येथील रहिवासी आहेत.  त्यांच्या मुलाने सुपारीसदृश्य वस्तू घरात आणली होती. या वस्तूला सुपारी समजून त्यांनी ती अडकित्त्याने फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गोलाकार वस्तू फोडताच एका क्षणात मोठा स्फोट झाला. तसेच काही समजायच्या आता त्यांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या उडाल्या. हाताची बोटे तुटल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.

गावठी बॉम्ब असल्याचा प्राथमिक अंदाज 

हा प्रकार समजताच पोलिसांना घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरु केला आहे. महिलेने सुपारी म्हणून फोडलेली वस्तू हा गावठी बॉम्ब असावा असा अंदाज बांधला जात आहे. पोलीस याच दिशेने आपला तपास करत आहेत. दरम्यान, हा जर गावठी बॉम्ब असेल तर तो कोणी तयार केला. तसेच लक्ष्मी देवळी यांच्या मुलाकडे तो कसा आला ? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन

दरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. पणजी (गोवा) कंट्रोल रुमला हा फोन आला होता. या फोनमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली होती. फोनवरुन ही माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर तात्काळ बंद केलं होतं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू सापडली नव्हती. अखेर हा फोन कॉल बोगस असल्याचं सिद्ध झालं होतं.

इतर बातम्या :

शाळेत खेळण्यावरुन वाद, थेट चाकू भोसकला, दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या, ठाण्यात खळबळ

Mumbai Drugs Case : ड्रग्स प्रकरणात दोन आरोपींना विशेष न्यायालयाकडून दिलासा, जामीन मिळालेले दोन आरोपी कोण?

दोन मुलांच्या आईला प्रपोज, नकारानंतर 21 वर्षीय तरुणातला सैतान जागा, कुऱ्हाडीचे सपासप वार

VIDEO : Mandeep Rode | चंद्रपुरात दारु दुकानांवर कारवाईची मनसेची मागणी@mnsadhikrut pic.twitter.com/22i9KnThFL

Woman loses fingers after explosive blows up while peeling areca nut in sawantwadi sindhudurg

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....