कामावर जात असलेल्या तरुणीची छेड, आरडाओरडा केल्यानंतर तरुणाला चोप

स्कायवॉकवरुन जात असलेल्या एका तरुणीची छेड काढण्याची घटना सोमवारी (15 डिसेंबर) कल्याण स्टेशनजवळ घडली. (Thane boy Teasing girl)

कामावर जात असलेल्या तरुणीची छेड, आरडाओरडा केल्यानंतर तरुणाला चोप
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 10:28 PM

ठाणे : स्कायवॉकवरुन जात असलेल्या एका तरुणीची छेड काढण्याची घटना (Teasin of young girl) सोमवारी (15 डिसेंबर) कल्याण स्टेशनजवळ घडली. स्कॉयवॉकवरुन गुरुदेव हॉटेलच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. दरम्यान, तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर इतर नागरिक तसेच बाकीच्या मुलींनी छेड काढणाऱ्या तरुणाला चांगलाच चोप दिला. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या तरुणाविरोधात ठोस कारवाई करावी अशी मागणी मुलींकडून केली जात आहे. (young boy Teasing young girl beaten by girls in Thane)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात काही तरुणी राहतात. त्या भिवंडी येथील पडघा येथे कामाला आहेत. त्या दररोज सकाळी घरातून निघतात आणि खासगी बसने कामाला जातात. सोमवारी एक तरुणी कल्याण स्टेशनला लागून असलेल्या स्कॉयवॉकवरुन चालत गुरुदेव हॉटेलच्या दिशेने जात होती. यावेळी स्कायवॉकवरील एका तरुणाने या तरुणीची छेड काढली.

तरुणींनी दिला चोप

छेड काढल्यानंतर संतप्त तुरुणीने (Teasing young girl ) आरडाओरडा केला. हा आरडाओरडा ऐकताच परिसरातील बसचालक स्कायवॉकवर धावत आले. तिच्यासोबत कामाला जाणाऱ्या बाकीच्या तरुणीही स्कायवॉककडे धावल्या. जमलेल्या तरुणींच्या मते या तरुणाने यापूर्वी त्यांचीही छेड काढलेली आहे. अखेर, जमलेल्या  तरुणींनी मिळून छेड काढणाऱ्या त्या तरुणाला चांगलाच चोप दिला. (young boy Teasing young girl beaten by girls in Thane)

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तरुणीची तक्रार दाखल करुन घेत तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. येथील स्कायवॉकवर अशा प्रकारच्या तरुणांचा वावर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून महापालिका आणि पोलिसांनी स्कायवॉकवर सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

संबंधित बातमी :

बोठेच्या जामीनावरील सुनावणीत ‘हनीट्रॅप’चा उल्लेख, बोठे गजाआड की बाहेर? निर्णयाकडे लक्ष

नवऱ्याने पत्नीच्या 14 बॉयफ्रेंडसना पाठवली नोटीस; नुकसानभरपाईची मागणी

भर दुपारी शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू, पतीनेही विष पिल्याने गुंता वाढला; मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान

(young boy Teasing young girl beaten by girls in Thane)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.