AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर दुपारी शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू, पतीनेही विष पिल्याने गुंता वाढला; मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान

भर दुपारी दोन वाजता महिला शिक्षिकेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. ही घटना जुळे सोलापूर येथील नीता रेसिडेन्सी येथे घडली.

भर दुपारी शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू, पतीनेही विष पिल्याने गुंता वाढला; मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान
| Updated on: Dec 14, 2020 | 6:14 PM
Share

सोलापूर : भर दुपारी दोन वाजता महिला शिक्षिकेचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. ही घटना जुळे सोलापूर येथील नीता रेसिडेन्सी येथे घडली. मृत महिलेचे नाव अर्चना हरवळकर असे आहे. या महिलेच्या डोक्यावर गंभीर मार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या महिलेचा अपघाताने मृत्यू झाला; की तिचा खून केला गेला, याचा शोध घेणे सुरु आहे. दरम्यान, महिलेच्या पतीनेही विष प्राशन केल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरात तर्कवितर्कांना आव्हान आले आहे. (Female teacher found dead in her home, husband also tried to suicide)

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील जुेळ येथील नीता रेसिडेन्सी येथे अर्चना हरवळकर नावाच्या शिक्षिका त्यांच्या कुटुंबासोबत राहत होत्या. या महिलेचा सोमवारी (14 डिसेंबर) दुपारी दोन वाजता अचानकपणे मृतदेह आढळला. या महिलेच्या डोक्यावर गंभीर दुखापत झालेली आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे महिलेच्या डोक्यात वरवंटा घालून तिचा खून केल्याचा अंदाज आहे. ही घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

पतीनेच खून केल्याचा संशय

महिला मृत अवस्थेत आढळताच परिसरात खळबळ उडाली. अर्चना यांच्या शेजाऱ्यांना त्यांचा खून झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांना कळवले. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान, महिलेचा मृत्यू झाला त्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर, डोक्यात वरवंटा घालून महिलेचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच, पतीने विष प्राशन केल्यामुळे पतीने हा खून केला असावा असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. विकास हरवळकर असे विष प्राशन केलेल्या पतीचे नाव आहे. (Female teacher found dead in her home, husband also tried to suicide)

खरं कारण शोधण्याचे पालिसांसमोर आव्हान

भर दुपारी मृत्यू आणि मृत्यूच्या टिकाणाची पाहणी केल्यानंतर महिलेचा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, असा कोणताही पुरावा न आढळ्याने महिलेच्या मृत्यूचे ठोस कारण समजू शकलेले नाही. तसेच, अर्चना हरवळकर यांचे पती विकास हरवळकर यांनी विष प्राशन केल्यामुळे हे प्रकरण आणखी किचकट झालेले आहे.  त्यांनी विष का घेतले असावे, याचे कोणतेही कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, पती विकास यांनीच अर्चना यांचा खून केले असावा असा संशय पोलिसांना आहे. संशयित विकास हरवळकर यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. तसेच त्यांच्यावर पोलिसांची नजर आहे.  (Female teacher found dead in her home, husband also tried to suicide)

संबंधित बातम्या :

प्रेयसीला खुश करण्यासाठी चित्रपट लेखकाचा ‘गोलमाल’, तुरुंगात रवानगी

रेखा जरे हत्याकांड | अटकेपासून वाचण्यासाठी बाळ बोठेची तगमग

धक्कादायक, अनैतिक संबधाला अडथळा ठरणाऱ्या युवकाचा खून, पोलिसांनी एका वर्षानंतर आवळल्या आरोपीच्या मुसक्या

(Female teacher found dead in her home, husband also tried to suicide)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.