AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्ल्यूटूथवर गाणी ऐकण्यावरून वाद, दोन जिगरी दोस्त भिडले; एकाने दुसऱ्याचा जीवच घेतला

ब्ल्यूटूथ स्पीकरवर गाणी ऐकणाऱ्या वादावादीचे भांडणात पर्यवसन झाले आणि त्याचा परिणाम अतिशय भयंकर झाला.

ब्ल्यूटूथवर गाणी ऐकण्यावरून वाद, दोन जिगरी दोस्त भिडले; एकाने दुसऱ्याचा जीवच घेतला
अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीसह शेजाऱ्याला संपवले
| Updated on: Jul 13, 2023 | 10:32 AM
Share

रांची : मैत्रीचे अनेक किस्से आपण ऐकले असतील, पाहिलेही असतील. खरा मित्र हाच आपल्या मित्राच्या (friends) मदतीला येतो, कठीण काळात पाठिशी उभा राहतो. काही मित्र तर असे असतात की वेळप्रसंगी पुढचा मागचा विचार न करता जीवाची बाजी लावायलाही कमी करत नाहीत. पण मित्रांच्या अन् मैत्रीच्या नावाला काळिमा फासणारा एक प्रकार समोर आला आहे.

तिथे एका मित्राने त्याच्या जीवलग मित्राची एका शुल्लक कारणावरून हत्या (youth killed friend) केल्याचे उघड झाले आहे. ब्ल्यूटूश स्पीकरवर गाणी ऐकण्यावरून झालेल्या छोट्या भांडणाचे वादत पर्यवसन झाले अन् एकाला त्यात आपला जीव गमवावा लागला. या वादाने एका मित्राला इतका राग आला की त्याने मित्राला मारण्यापूर्वी एकदाही मैत्रीचा विचार केला नाही.

ही घटना झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यातील आहे. सिमडेगा जिल्ह्यातील बानो ब्लॉकमधील महाबुआंग पोलीस स्टेशन हद्दीतील बेदैरगी गावातील रहिवासी 14 वर्षीय पूना कांडुलन याची त्याच गावातील 19 वर्षीय अजय सिंहसोबत मैत्री होती. या दोघांची मैत्री संपूर्ण गावाला माहीत होती, लोक त्यांच्या मैत्रीचे उदाहरणही द्यायचे. ते दोघे एकत्र मिळून हॉकी खेळायला जायचे.

रविवारी संध्याकाळीही ते दोघे एकत्र हॉकी खेळायला गेले होते. हॉकी खेळल्यानंतर हे दोन्ही तरुण गावाबाहेरील एका पुलाजवळ बसून ब्लूटूथ स्पीकरवर गाणीत ऐकत होते. मात्र ब्ल्यूटूथवर आपापल्या आवडीचे गाणे ऐकण्यावरून त्या दोघांमध्ये भांडण झाले आणि हळूहळू ते इतकं वाढल की दोघांची मारामारी सुरू झाली.

हॉकी स्टिकने केला डोक्यावर वार

यामुळे संतापलेल्या अजयने पूना याच्या डोक्यावर हॉकी स्टिकने वार केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे 14 वर्षीय पूना बेशुद्ध पडला आणि थोड्याच वेलात त्याचा मृत्यू झाला. रागामुळे हैवान झालेल्या अजयने पूनाच मृतदेह पुलाच्या खाली फेकून दिला आणि कोणाला सापडून नये म्हणून तो पानांनी झाकला.

शुद्ध पडून जागीच मृत्यू झाला. यानंतर, मित्रातून राक्षस बनलेला आरोपी अजय सिंग याने पुना कंदुलनाचा मृतदेह लपवण्याच्या उद्देशाने कल्व्हर्टखाली फेकून दिला. या राक्षसी कृत्यानंतर आरोपी अजय सिंग त्याच्या घरी गेला आणि घरातून धारदार शस्त्र घेऊन आला. पूनाची ओळख पटू नये म्हणून त्याने त्याचा चेहरा आणि शरीरावर असंख्य वारही केले.

कसा झाला खुनाचा उलगडा ?

तिथे मृतदेह टाकून दिला होता, त्या भागातून दुर्गंध येऊ लागल्यावर गावकऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना तेथे कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिमडेगा सदर रुग्णालयात पाठवण्यात आला.

त्यानंतर पोलिसांनी पूनाचा मित्र अजय सिंग याला संशयाच्या आधारावर ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. पोलिसांनी हिसका दाखवताच अजयने आपल्याच मित्राच्या हत्येची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करत कोठडीत त्याची रवानगी केली. आरोपी अजय सिंगच्या सांगण्यावरून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली हॉकी स्टिक जप्त केली.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...