आधी शरीरसुखाची मागणी, विरोध करताच 60 वर्षीय महिलेची हत्या, नंतर प्रेतावर बलात्कार

काही घटना इतक्या विचित्र, भयानक आणि संतापजनक घडतात की त्या लिहिता किंवा सांगताही येत नाहीत. या अशा घटना नेमक्या घडू तरी कशा शकतात? असा सवाल मनात उपस्थित होतो.

आधी शरीरसुखाची मागणी, विरोध करताच 60 वर्षीय महिलेची हत्या, नंतर प्रेतावर बलात्कार
प्रातिनिधिक फोटो

जयपूर : काही घटना इतक्या विचित्र, भयानक आणि संतापजनक घडतात की त्या लिहिता किंवा सांगताही येत नाहीत. या अशा घटना नेमक्या घडू तरी कशा शकतात? आरोपींना पोलिसांचा काहीच धाक राहिलेला नाही का? किंवा वासनेची भूक एखाद्या विकृताला इतक्या टोकाच्या कृत्यापर्यंत घेऊन जाऊ शकते? असे अनेक सवाल उपस्थित होतात. विशेष म्हणजे देशात वारंवार बलात्काराच्या, महिला अत्याचाराच्या घटना समोर येत असताना राजस्थानमध्ये अशा प्रकारची आणखी एक घटना समोर आल्याने महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय. महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

नेमकं प्रकरण काय?

राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही बुधवारी (15 सप्टेंबर) रात्री घडली. एक 19 वर्षीय तरुण दारुच्या नशेत एका महिलेच्या घरात शिरला. त्यावेळी घरात एक 60 वर्षीय महिला  एकटी होती. महिला घरात एकटीच असल्याची माहिती समजल्यानंतर आरोपी तरुण महिलेला त्रास द्यायला सुरुवात करतो. तो महिलेकडे शरीरसुखाची मागणी करतो. पण महिला त्याला स्पष्टपणे नकार देत त्याला हटकते. घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते. यावेळी आरोपी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. पण महिला त्याचा प्रतिकार करते. त्यामुळे आरोपीचा रागाचा पारा चढतो.

महिलेची हत्या करत बलात्कार

आरोपी तरुण महिलेसोबतच्या झटापटीत योग्य संधी मिळताच तिचा गळा दाबतो. त्यानंतर तो तिचा श्वास सुटेपर्यंत गळा सोडत नाही. यावेळी महिला जीवाचा आकांत करते, श्वास घेण्यासाठी तडफडते. पण आरोपी नराधमाला तिची जरासुद्धा दया येत नाही. अखेर महिलेचा मृत्यू होता. आरोपी फक्त एवढ्यावरच थांबत नाही. तो मृतक महिलेच्या प्रेतावर बलात्कार करतो. त्यानंतर तिथून पळून जातो.

आरोपीला बेड्या

संबंधित घटेनची माहिती पोलिसांना कळताच पोलीस महिलेच्या घरी दाखल होतात. ते तपासाची चक्रे फिरवत आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीवर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी इतक्या घृणास्पद पद्धतीने कसं वागू शकतो? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय. तर काही स्थानिकांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येतेय. पोलीस सध्या या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.

बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ

देशात सध्या बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. दररोज बलात्काराच्या अमानुष घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या साकीनाका परिसरात तर प्रचंड भयानक घटना घडली होती. एका नराधमाने मध्यरात्री महिलेला मारहाण करत अमानुषपणे बलात्कार केला होता. यावेळी आरोपीने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी सळई टाकत क्रूरतेचा कळस गाठला होता. संबंधित घटनेने दिल्लीत दहा वर्षांपूर्वी घडलेल्या निर्भया हत्याकांडाच्या घटनेची आठवण करुन दिली. या घटनेवर महाराष्ट्रासह देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा :

विकृती ! रुममध्ये कुणी नाही बघून अवघ्या 15 महिन्याच्या चिमुकलीला अमानुषपणे मारहाण, संतापजनक घटना कॅमेऱ्यात कैद

एकेकाळचा सख्खा मित्रच ठरला पक्का वैरी, टोळक्याकडून गुंडाची भर रस्त्यात दिवसाढवळ्या हत्या, उल्हासनगरात भयानक थरार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI