मावशीवर जीव भाळला, शिव मंदिरात लग्नाची रेलचेल, ग्रामस्थांना कळताच गदारोळ, अखेर पोलिसांकडून तोडगा

झारखंडच्या एका तरुणाने चक्क आपल्या चुलत मावशीसोबतच लग्न केल्याचं समोर आलं आहे (Youth love marriage with aunt in Jharkhand).

मावशीवर जीव भाळला, शिव मंदिरात लग्नाची रेलचेल, ग्रामस्थांना कळताच गदारोळ, अखेर पोलिसांकडून तोडगा

रांची : झारखंडच्या चतरा जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. चतरा जिल्ह्यातील रक्सी गावाच्या एका तरुणाने चक्क आपल्या चुलत मावशीसोबतच लग्न केल्याचं समोर आलं. तरुण आणि त्याची चुलत मावशी यांचं एकमेकांवर प्रेम भाळलं. त्यामुळे त्यांनी दोघांनी नातेवाईक, समाज आणि ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन शिव मंदिरात जाऊन लग्न लावलं (Youth love marriage with aunt in Jharkhand).

ग्रामस्थांचा शिव मंदिराजवळ गदारोळ

संबंधित तरुण त्याच्या चुलत मावशीसोबत शिव मंदिरात लग्न करत असल्याची माहिती गावातील काही लोकांना समजली. त्यानंतर हे वृत्त संपूर्ण गावात पसरलं. तरुणाच्या कुटुंबियांना देखील याबाबत माहिती मिळाली. सर्व ग्रामस्थ आणि त्याचे कुटुंबीय शिव मंदिरावर धावून आले. त्यांच्या सर्वांचा रागाचा पारा चढलेला होता. त्यामुळे भेदरलेला तरुण आपल्या पत्नीसोबत तेथून पळून गेला.

प्रेमी युगुल पोलिसांकडे गेले

तरुण आपल्या एका मित्राच्या घरी त्याच्या पत्नीला घेऊन गेला. तो रात्रभर तिथे थांबला. त्यानंतर दोघांनी पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकूण घेतली. दोघांचं वय हे 21 वर्षांपेक्षा जास्त असल्याने त्यांना त्यांच्या लग्नाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना बोलावलं.

पोलिसांकडून प्रेमी युगुलाच्या कुटुबियांची समजूत 

नवरदेव आणि नवरीच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला स्वीकार करण्यास नकार दिला. पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा भरपूर प्रयत्न केला. तरीही नातेवाईक आणि ग्रामस्थ यांच्याकडून विरोध सुरुच होता. दुसरीकडे प्रेमी युगुलही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, एकत्रच राहणार, अशा हट्टावर अडून होते (Youth love marriage with aunt in Jharkhand).

कुटुबियांनी अखेर स्वीकारलं

पोलिसांनी प्रेमी युगुलाला लग्न करण्याचा अधिकार असल्याचं सांगत कसंतरी त्यांच्या नातेवाईकांना गृहित धरुन लग्न लाऊन दिलं. त्यानंतर त्यांनी प्रेमी युगुलाला आपल्या नातेवाईकांसोबत घरी पाठवलं. मात्र, घरी गेल्यावर प्रचंड गदारोळ झाला. प्रेमी युगुलाच्या कुटुबियांनी त्यांचा स्वीकार करण्यास विरोध केला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, काही ग्रामस्थांनी प्रेमी युगुलाच्या आई-वडिलांची समजूत काढली. त्यामुळे हे प्रकरण निवळलं.

हेही वाचा : एक-दोन नव्हे तर दारु प्यायल्याने चक्क 14 जणांचा मृत्यू, बिहार हादरलं !

Published On - 8:07 pm, Sun, 4 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI