शिकार करताना गोळी सुटून मित्र दगावला, अपराधी भावनेतून तिघांची आत्महत्या

बंदुकीतून चुकून गोळी सुटल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्यामुळे गिल्टी फीलिंगमधून तिघा जणांनी विष प्राशन करुन आयुष्य संपवलं (Friends Commit Suicide out of Guilt)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:08 PM, 6 Apr 2021
शिकार करताना गोळी सुटून मित्र दगावला, अपराधी भावनेतून तिघांची आत्महत्या
बंदूक - प्रातिनिधीक फोटो

देहरादून : शिकार करताना गोळी सुटून झालेल्या अपघातात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आपल्या समक्ष झालेल्या अपघातात मित्र दगावल्याची भावना तिघा तरुणाांना सलत होती. याच अपराधी भावनेतून तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. (Youth Shot Accidentally On Hunting Expedition Three Friends Commit Suicide out of Guilt)

गिल्टी फीलिंगने तिघांचा बळी

उत्तराखंडमधील तेहरी जिल्ह्यातील कुंडी गावाजवळच्या जंगल परिसरात हा प्रकार घडला. एसडीएम पी आर चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार बंदुकीतून चुकून गोळी सुटल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्यामुळे गिल्टी फीलिंगमधून तिघा जणांनी विष प्राशन करुन आयुष्य संपवलं. हे तिघेही 18 ते 22 वर्ष वयोगटातील होते. सात जणांच्या ग्रुपमधील चौघांचा अशाप्रकारे करुण अंत झाला. उर्वरित मित्रांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली.

नेमकं काय घडलं?

सात मित्रांचा ग्रुप शनिवारी रात्री भिलंगणा ब्लॉकमधील गावातून शिकारीसाठी निघाला होता. 22 वर्षांचा राजीव या ग्रुपचं नेतृत्व करत होता. त्याच्या हातात गोळ्यांनी भरलेली बंदूक होती. चालताना त्याचा पाय निसटला आणि तो खाली पडला. त्यावेळी त्याच्या खांद्यावरील बंदुकीतून गोळी सुटली आणि संतोष नावाच्या तरुणाला लागली. संतोष खाली कोसळताच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊ लागला.

चूक एकाची, अपराधी भावना अन्य तिघांना

या प्रकारानंतर राजीवने घटनास्थळावरुन पोबारा केला. मात्र सोबान, पंकज आणि अर्जुन यांच्या मनात अपराधी भावनेने घर केलं. त्यांनी कीटकनाशकाचे प्राशन करुन जीव दिला. त्यानंतर राहुल आणि सुमीत या दोघांनी तातडीने याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यांनी तिघांना बेळेश्वर आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी पंकज आणि अर्जुन यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. तर उपचारादरम्यान सोबानने प्राण सोडले.

संबंधित बातम्या :

लिव्ह इन संबंधातून मूल, तरी पहिल्या नवऱ्याला घटस्फोटास नकार, तरुणाकडून विवाहित प्रेयसीची हत्या

ल्युडोच्या वादातून मुंबईत मित्राची हत्या, नैसर्गिक मृत्यूचं बिंग शेजाऱ्याने शोकसभेत फोडलं

(Youth Shot Accidentally On Hunting Expedition Three Friends Commit Suicide out of Guilt)