मेव्हणीच्या प्रेमात, भाऊजी तुरुंगात

मेव्हणीला सतत त्रास देत असल्यामुळे चंद्रपुरात एका भाऊजीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल (Brother in law molestation on sister in law) करण्यात आला आहे.

मेव्हणीच्या प्रेमात, भाऊजी तुरुंगात

चंद्रपूर : मेव्हणीला सतत त्रास देत असल्यामुळे चंद्रपुरात एका भाऊजीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल (Brother in law molestation on sister in law) करण्यात आला आहे. मेव्हणीने प्रेमाला दाद दिली नसल्याने भाऊजींनी काल (3 मार्च) थेट रस्त्यात आडवून मेव्हणीला मारहाण केली. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी भाऊजींच्याविरोधात तक्रार दाखल केली. बबलू देवराज जाधव असं आरोपी भाऊजीचे नाव (Brother in law molestation on sister in law) आहे.

बबलूचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. तेव्हा त्याची पत्नी अल्पवयीन असल्याचे समजले. मात्र याकाळात पत्नीच्या काकाच्या मुलीवर त्याचा जीव जडला. नात्याने ती त्याची मेव्हणी. तिही अल्पवयीन आहे. तो तिला अनेकदा प्रपोज करायचा. मात्र तिने त्याला दाद दिली नाही.

मेव्हणी जिल्हा क्रीडासंकुलात खो-खोचा सराव करायला जायची. हीच संधी साधून भाऊजी काल तिथे पोहोचला. सायकलने जाणाऱ्या मेव्हणीला रस्त्यावर थांबवून पुन्हा प्रपोज करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याला चांगलेच खडसावले. नाराज झालेल्या बबलूने तिला मारहाण केली.

या सर्व प्रकरणानंतर पीडितेने घरी पोहोचल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. सर्व कुटुंबीय रामनगर ठाण्यात पोहोचले आणि बबलू विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. बबलूला अटक करण्यात आली असून अधिक चौकशी सुरु आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *