मनसेच्या महिला कार्यकर्तीवर बलात्कार, मुंबईत मनसैनिकाला बेड्या

विद्यार्थीदशेपासून एकत्र असलेल्या आणि सध्या मनसेमध्ये असलेल्या कार्यकर्त्याने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार मनसे कार्यकर्तीने केला आहे

Chembur MNS Worker Rape, मनसेच्या महिला कार्यकर्तीवर बलात्कार, मुंबईत मनसैनिकाला बेड्या

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्तीवर बलात्कार (Chembur MNS Worker Rape) केल्याच्या आरोपातून मनसेच्याच एका कार्यकर्त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबईतील चेंबुर परिसरात राहणाऱ्या सतीश वैद्यला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

पक्षातील महिला सहकाऱ्याला धमकावणे, हल्ला करणे आणि बलात्कार या आरोपाखाली सतीश वैद्यला अटक झाली आहे. वैद्य हा चेंबुरमध्ये मनसेच्या स्थानिक कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘पीटीआय’ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

मनसेच्या पीडित महिला कार्यकर्तीने टिळकनगर पोलिसांमध्ये सतीश वैद्यविरोधात बलात्काराची (Chembur MNS Worker Rape) लेखी तक्रार दाखल केली होती. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

काय आहे आरोप?

आरोपी सतीश वैद्य आणि पीडिता हे एकाच वर्गात शिकत होते. त्यानंतर दोघंही जण मनसेमध्ये कार्यकर्ते म्हणून सहभागी झाले. दोन वर्षांपूर्वी आरोपी आपल्याला जेवणासाठी ठाण्याला घेऊन गेला. त्यानंतर त्याने आपल्यावर बलात्कार केला, असा दावा पीडितेने तक्रारीत केला आहे.

आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीस, तर या भेटीगाठींबद्दल तुझ्या नवऱ्याला सांगेन, अशी धमकी देत त्याने मला ब्लॅकमेल केलं, असंही पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.

राज ठाकरेंना ईडीची नोटीस, ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडी नोटीस पाठवल्याच्या कारणामुळे गेल्या महिन्यात ठाण्यातील एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केली होती. मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचा निकटवर्तीय प्रवीण चौगुलेने टोकाचं पाऊल उचललं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *