VIDEO : नागपुरात कुख्यात गुंडाचा पोलीस व्हॅनमध्येच TikTok व्हिडीओ

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपुरातील गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण  दर दिवसाआड ठळक होत जात आहे. धुमाकूळ घालणाऱ्या गुंडांना पकडणं दूरच, ज्यांना पकडलं आहे त्यांचेही कारनामे गृहविभागाला लाजीरवाणं ठरणारं आहे. आता नागपुरातून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कुख्यात गुंडाने चक्क पोलीस व्हॅनमध्येच TikTok व्हिडीओ बनवल्याचा प्रकार समोर आला …

VIDEO : नागपुरात कुख्यात गुंडाचा पोलीस व्हॅनमध्येच TikTok व्हिडीओ

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपुरातील गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण  दर दिवसाआड ठळक होत जात आहे. धुमाकूळ घालणाऱ्या गुंडांना पकडणं दूरच, ज्यांना पकडलं आहे त्यांचेही कारनामे गृहविभागाला लाजीरवाणं ठरणारं आहे. आता नागपुरातून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कुख्यात गुंडाने चक्क पोलीस व्हॅनमध्येच TikTok व्हिडीओ बनवल्याचा प्रकार समोर आला आहे.

सय्यद मोबीन अहमद हा नागपुरातील कुख्यात गुंड आहे. सय्यदला एका गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी पोलीस व्हॅनमध्ये ठेवलेल्या गुंड सय्यद मोबीन अहमदने TikTok व्हिडीओ बनवला.

गुंड सय्यदने बनवलेला TikTok व्हिडीओ बघता बघता नागपूरभर सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आणि पोलीस दलातही एकच खळबळ उडाली.

पोलीस व्हॅनमध्ये TikTok व्हिडीओ बनवला, हे धक्कादायक आहेच, मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गुंडाला मोबाईल फोन कसा वापरु दिला, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पोलिसांनीच सय्यदला मोबाईल दिल्याची चर्चाही आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी खरंच नागपुरातील गुंडगिरी संपवायची आहे की गुंडांना अभय द्यायचे आहे, असाही प्रश्न नागपूरकरांकडून विचारला जात आहे.

दरम्यान, नागपुरातील कोराडी पोलिसांनी गुंड सय्यद याच्यावर शासकीय वाहनात गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *