जमील शेखला ठार केलं, आता पुढचं टार्गेट मीच असेन : अविनाश जाधव

माझे कार्यकर्ते सुरक्षित नसतील, तर मी पोलीस संरक्षण घेऊन करु काय? असं अविनाश जाधव म्हणाले. (Avinash Jadhav on Jameel Shaikh murder)

जमील शेखला ठार केलं, आता पुढचं टार्गेट मीच असेन : अविनाश जाधव
आम्ही राणेंचे कार्यकर्ते नाही, राज ठाकरेंचे सैनिक आहोत, मनसे नेते अविनाश जाधवांनी ललकारले
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 12:38 PM

ठाणे : मनसे पदाधिकारी जमील शेख (MNS Jameel Shaikh shot dead) यांची भर दिवसा डोक्यात गोळी मारुन हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसापूर्वी भर दिवसा घडलेल्या या घटनेनंतर, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (MNS leader Avinash Jadhav) यांनी, “माझे कार्यकर्ते सुरक्षित नसतील तर मलाही संरक्षण नको, आता पुढचं टार्गेट मीच असेन याची मला खात्री आहे” असं म्हटलंय. (MNS leader Avinash Jadhav reaction on Jameel Shaikh murder)

अविनाश जाधव म्हणाले, “जमील शेख हा कडवट महाराष्ट्र सैनिक होता. तो नेहमी लोकांची काम घेऊनच कार्यालयात येत होता. दिवसरात्र तो जनसेवेसाठी झटत होता. ज्यावेळी त्याची हत्या झाली, त्याच्या आधी त्याने पक्ष कार्यालयात फोन करुन मी आहे का विचारलं आणि पाच मिनिटात येतो असं सांगितलं. तिकडून तो माझ्याकडे येत होता. मात्र ठाण्यासारख्या शहरात, कमिशनर ऑफिसपासून दहा मिनिटांच्या अंतरावर गोळी झाडून जर हत्या होत असेल, तर मी का संरक्षण घ्यावं? माझे कार्यकर्ते सुरक्षित नसतील, तर मी बॉडीगार्ड घेऊन फिरणं योग्य नाही. त्यामुळेच मी पोलीस संरक्षण हटवण्याबाबतचं पत्र पोलीस आयुक्तांना दिलं आहे. माझे कार्यकर्ते सुरक्षित नसतील, तर मी पोलीस संरक्षण घेऊन करु काय? असं त्यामध्ये म्हटलं आहे”

यापुढचं टार्गेट मीच

मला खात्री आहे की यापुढचं टार्गेट मीच असेन. त्यांनी एक एक करत पुढे आले आहेत. त्यामुळे त्यांचं पुढचं टार्गेट मीच असेन, याची मला खात्री आहे, असंही अविनाश जाधव म्हणाले. याआधीही 2014 मध्ये जमीलवर हल्ला झाला होता, आजपर्यंत त्याचे आरोपी सापडले नाहीत. त्यामुळे काय बोलायचं? आता जो हल्ला झालाय, तो नीट प्लॅन करुन तो हल्ला केला. सराईत गुन्हेगारांचा वापर करुन, सुपारी देऊन हे हत्याकांड केलं. अतिशय जवळ येऊन जमीलला गोळी मारली. त्यामुळे ठाणे शहर सुरक्षित नाही, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला.

जमील शेख यांची हत्या

ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची दोन दिवसापूर्वी म्हणजेच 23 नोव्हेंबरला हत्या करण्यात आली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी, जमील यांच्यावर गोळी झाडून त्यांना ठार केलं. दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने पिस्तुलाने नेम धरुन जमील यांच्या डोक्यात गोळी झाडली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ठाण्याच्या राबोडी परिसरात बाईक शेजारी त्यांचा मृतदेह आढळून आला.

(MNS leader Avinash Jadhav reaction on Jameel Shaikh murder)

संबंधित बातम्या 

ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, डोक्यात गोळी झाडल्याचा आरोप 

Non Stop LIVE Update
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.