गाडीत पेट्रोल भरलं की पाणी?, जाब विचारणाऱ्या तरुणांना पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची जबर मारहाण

गाडीत पेट्रोल टाकले तर पाणी कसे काय निघतं?, इतकं विचारलं म्हणून दोन तरुणांना पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली.

गाडीत पेट्रोल भरलं की पाणी?, जाब विचारणाऱ्या तरुणांना पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची जबर मारहाण

कल्याण-डोंबिवली : गाडीत पेट्रोल टाकले तर पाणी कसे काय निघतं, इतकं विचारलं म्हणून दोन तरुणांना (Kalyan Petrol Pump Workers) पेट्रोल पंपावरील सर्व कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या गुंडगिरीने डोंबिवलीत एकच खळबळ उडाली. या प्रकरणी चार जणांना अटक करुन पोलीस पुढील तपास करीत आहेत (Kalyan Petrol Pump Workers).

कल्याण पूर्वेत राहणारा मोहम्मद सहीम आणि त्याचा मित्र शुभम सिंग काही कामानिमित्त डोंबिवलीला गेले होते. येताना त्यांच्या गाडीतील दुचाकीमधील पेट्रोल कमी असल्याने त्यांनी गाडी डोंबिवलीतील उस्मा पेट्रोल पंपावर घेतली. गाडीत पेट्रोल टाकले गेले. काही अंतरावर गेल्यानंतर गाडीमध्ये बिघाड झाला.

मोहम्मद सहीम हा गॅरेजमध्ये काम करतो. त्यामुळे त्याच्या लक्षात आले की, गाडीत काही बिघाड झाला आहे. त्याने गाडीतील पेट्रोल चेक केले. त्याठिकाणी गाडीतून पेट्रोल ऐवजी पाणी बाहेर आले. त्वरीत त्यांनी पुन्हा पेट्रोल पंपावर जाऊन विचारणा केली की, गाडीत पेट्रोल भरले होते, तर त्यातून पाणी कसे येत आहे? पेट्रोल कुठे गेले?

पंपावरील कर्मचाऱ्यांना या गोष्टीचा राग आला. कर्मचाऱ्यांनी दोन्ही तरुणांना मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत शुभमचे हात आणि पाय फॅक्चर झाले आहेत. तर मोहम्मदलाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणातील चारही जण विरेंद्र सिंग, विक्रांत सिंग गोविंद शहा आणि अभय काटवटे यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती मानपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दादा हरी चौरे यांनी दिली.

या दोघांना पेट्रोल पंपावरील सर्व कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती, फक्त चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे, असा आरोप मोहम्मदच्या नातेवाईकांनी केला आहे.

Kalyan Petrol Pump Workers

संबंधित बातम्या :

लग्नास नकार दिल्यानं तरुणीला मारहाण, कल्याण पोलिसांनी प्रियकराला 2 तासात ठोकल्या बेड्या

नागपुरात तलवार, सुरीसारख्या घातक शस्त्रांचा साठा जप्त, दोघांना अटक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *