मालकाची हत्या करून फरार झालेला आरोपी 19 वर्षानंतर सापडला; ठाणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

डोंबिवलीत 8 मे 2001 साली एका लॉजमध्ये एका 56 वर्षीय व्यक्तिचा मृतदेह आढळून आला.

मालकाची हत्या करून फरार झालेला आरोपी 19 वर्षानंतर सापडला; ठाणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 8:53 PM

कल्याण : मालकाची हत्या करुन फरार झालेल्या आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या (Kalyan Murder Case Solved) एक नंबर युनिटने 19 वर्षांनंतर आरोपी राजाराम राजीव शेट्टी याला अटक केली आहे. डोंबिवलीत हत्येचा प्रकार घडल्यानंतर सतत पोलीस या आरोपीच्या शोधात होती. त्यांच्या तपासाला 19 वर्षानंतर यश आहे(Kalyan Murder Case Solved).

डोंबिवलीत 8 मे 2001 साली एका लॉजमध्ये एका 56 वर्षीय व्यक्तिचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन सी.जे. रेगो नावाच्या व्यक्तिची हत्या करण्यात आली होती. रेगोसोबत त्याच्या केअर टेकर एच. राजाराम राजीव शेट्टी राहत होता. तो घटनेनंतर पसार झाला होता. हत्या एच. राजाराम शेट्टी याने केली असेल, असा पोलिसांचा दाट संशय होता.

रामनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला. आरोपीचा शोध सुरु होता. अनेक वर्षे शोध सुरु असून आरोपी मिळत नव्हता. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशानंतर या गुन्हयाचा छडा लावण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकने काम सुरु केले.

पोलीस अधिकारी दत्तात्रय सरक यांना या प्रकरणाचा तपास दिला गेला होता. सहा महिन्यांपासून सरक आणि त्यांचे सहकारी हे शेट्टी याच्या शोधात होते. शेट्टीचा कर्नाटक येथील पत्ता पोलिसांकडे होता. त्याच्या आई आणि भावाविषयी पोलिसांना माहिती होती. मात्र, शेट्टीने लग्न न केल्याने तो एकांकी जीवन जगत होता. याचाच फायदा त्याला मिळत होता. अखेर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार आनंद भिलारे यांना एच शेट्टी संदर्भात काही सुगावा लागला (Kalyan Murder Case Solved).

पोलीस अधिकारी दत्तात्रय सरक यांचे पथक नाशिकला शेट्टीच्या शोधासाठी निघाले. तो नाशिकला आढळून आला नाही. त्यानंतर पोलीस तपास पथक रायगडला गेला. अखेर शेट्टीला आज पहाटे विटावा नाका कळवा ठाणे येथेून सापळा रचून पकडण्यात आले.

या प्रकरणी पोलीस अधिकारी सरक यांचे म्हणणे आहे की, एच. राजाराम राजीव शेट्टी हा सी. जे. रेगो यांचा केअर टेकर होता. नंतर या दोघांमध्ये काही कारणावरुन वाद वाढत गेले. त्या रागातून शेट्टी याने रेगो यांची हत्या करुन पळून गेला होता. सध्या शेट्टीला रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

Kalyan Murder Case Solved

संबंधित बातम्या :

घरातून गायब झालेल्या तिघांचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले, आत्महत्येची शक्यता; शहापूर हादरले

शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून वारंवार छेडछाड; वैतागलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.