AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जबरी चोरी करणाऱ्यांना सापळा लावून अटक, 51 हजारांचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून मोबाईल हॅण्डसेट आणि बजाज बॉक्सर मोटार सायकल असा एकूण 51 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

जबरी चोरी करणाऱ्यांना सापळा लावून अटक, 51 हजारांचा मुद्देमाल जप्त
| Updated on: Nov 25, 2020 | 6:05 PM
Share

कोल्हापूर : इचलकरंजी शहरामध्ये परप्रांतीय कामगारांचे मोबाईल जबरीने चोरी करणाऱ्या (Two Thief Arrested) दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजी पथकाने मुद्देमालासह अटक केली. दरम्यान, आरोपींकडून मोबाईल हॅण्डसेट आणि बजाज बॉक्सर मोटार सायकल असा एकूण 51 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे (Two Thief Arrested).

इचलकरंजी ते चंदूरला जोडणाऱ्या रोडवर तात्यासाहेब अशोक पाटील (चंदूर) हे कामावर जात असातना दोन अनोळखी इसम मोटर सायकलवरुन पाटील यांच्या पाठीमागून आले. त्यांना धक्काबुक्की करुन हातातील मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 5 हजार 500 रुपये किंमतीचा माल जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला. त्यानंतर तात्यासाहेब पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानुसार, या चोरीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजी यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचण्यात आला. यावेळी चंदूर ओढ्यावरील पुलावरुन गजानन रामचंद्र पटवेगार (वय 21) आणि मुदकाप्पा येलगुरप्पा मुलीमणी (वय 23) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेला मोबाईल हॅण्डसेट आणि बजाज बॉक्सर मोटार सायकल असा एकूण 51 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह आयुब गडकरी, प्रशांत कांबळे, रणजित पाटील, अमर शिरढोणे,राजू कांबळे, यशवंत कुंभार तसेच सायबर विभागाकडील सचिन बेंडखळे यांनी केली.

Two Thief Arrested

संबंधित बातम्या :

दुधाच्या बिल वसुलीसाठी डेअरीवाल्याची दबंगगिरी, महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

लिकर किंग अतुल मदन फरार घोषित, नाशिक पोलिसांच्या दोन पथकांकडून शोध सुरु

तीन खड्ड्यात तब्बल 56 लाखांच्या नोटा पुरल्या, गुंतवणूकदारांना गंडवणाऱ्या विजय गुरनुलेला बेड्या

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.