AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डीआयजी निशिकांत मोरेंविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणारी मुलगी बेपत्ता, घरात सुसाईड नोट सापडली

मोटर ट्रान्सपोर्ट विभागाचे डीआयजी निशिकांत मोरे यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार (Minor girl missing in nishikant more sexually harassment case) दाखल करणारी अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली आहे.

डीआयजी निशिकांत मोरेंविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करणारी मुलगी बेपत्ता, घरात सुसाईड नोट सापडली
| Edited By: | Updated on: Jan 07, 2020 | 8:46 PM
Share

नवी मुंबई : मोटर ट्रान्सपोर्ट विभागाचे डीआयजी निशिकांत मोरे यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार (Minor girl missing in nishikant more sexually harassment case) दाखल करणारी अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली आहे. या मुलीने जाताना एक सुसाईड नोटही लिहिली आहे. घर सोडण्यापूर्वी तिने रेल्वेखाली जावून आत्महत्या करण्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे या सुसाईड नोटमध्ये तिने माझ्या आत्महत्येस मोरे जबाबदार असल्याचे म्हटले. पोलिसांचे पाच पथक बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेत आहेत.

सहा महिन्यापूर्वी पीडित मुलीच्या वाढदिवशी डीआयजी मोरेंनी मुलीचा विनयभंग (Minor girl missing in nishikant more sexually harassment case) केला होता. यानंतर पीडितेने तळोजा पोलीस ठाण्यात मोरेंविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. पण सहा महिने उलटूनही पोलिसांनी दखल घेतली नव्हती. काहीदिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या हस्तक्षेपानंतर मोरे यांच्यावर पॉक्सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यानंतर ते फरार आहेत. तसेच पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पीडित मुलीच्या वडिलांनी 5 जून 2019 रोजी खारघरमध्ये आपल्या अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी त्यांनी पुण्याचे आरोपी डीआयजी निशिकांत मोरे यांनाही बोलावलं. वाढदिवस साजरा करताना मुलीच्या भावाने तिच्या चेहऱ्यावर केक लावला. त्यानंतर आरोपी मोरे यांनी पीडित मुलीच्या शरीरावरील केक जीभेने चाटत विनयभंग केला. आरोपी मोरेंच्या पत्नीनेच याचा व्हिडीओही तयार केला. त्यांनी हा व्हिडीओ पीडित मुलीच्या पालकांना पाठवत आरोपी मोरेंपासून सावध राहण्याचा सल्ला दिला.

या प्रकरणानंतर पीडित मुलीने आरोपी मोरेंविरुद्ध तक्रार दाखल केली. तर संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी मोरे यांनी पीडित मुलीच्या वडिलांना धमकी दिली होती, असं पीडितेच्या वडिलांनी सांगितले. विशेष म्हणजे ही घटना होऊन 5 महिने उलटूनही पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही गंभीर दखल न घेता गुन्हाही दाखल केला नव्हता.

आरोपी निशिकांत मोरेंकडून पीडितेवर पाळत 

पीडित मुलगी 21 डिसेंबर 2019 रोजी खारघर येथील एका शॉपिंग सेंटरमध्ये वही खरेदीसाठी गेली होती. आरोपी मोरे यांनी तेथेही पीडितेचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. आरोपी मोरे पाठलाग करत असल्याचं लक्षात येताच मुलीने या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. यानंतर पीडितेच्या वडिलांनी घटनास्थळी येऊन आरोपीचा चालक आणि अन्य एक कर्मचारी यांना थेट खारघर पोलीस ठाण्यात आणले होते.

खारघरमधील शॉपिंग सेंटरमध्ये मुली ट्युशनसाठी जातात. याच ठिकाणी डीआयजी मोरे माझ्या मुलीचं अपहरण करण्यासाठी पोलीस गाडीमध्ये आल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला होता.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.