मंदिरात प्रवेशबंदी असतानाही दानपेटीवर चोरट्याचा डल्ला, चोरी सीसीटीव्हीत कैद

नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत जयहिंद सोसायटीमधील हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

मंदिरात प्रवेशबंदी असतानाही दानपेटीवर चोरट्याचा डल्ला, चोरी सीसीटीव्हीत कैद
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 4:29 PM

नागपूर : कोरोनामुळे राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास मनाई केली आहे (Nagpur Robbery In Temple). त्यामुळे भाविकांना मंदिराच्या बाहेरुनच देवाला नमस्कार करावा लागत असला तरी चोरटे मात्र अगदी आरामात देवापर्यंत पोहोचत आहेत. एवढेच नाही, तर हे चोरटे लॉकडाऊनमुळे कुलूपबंद असलेल्या देवाच्या तिजोरीवर डल्लाही मारत असल्याची घटना समोर येत आहेत. या चोरट्यांचे कारनामे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत (Nagpur Robbery In Temple).

नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत जयहिंद सोसायटीमधील हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या समोर आला आहे. त्यामध्ये एक चोरटा देवाच्या समोर ठेवलेली दानपेटी घेऊन जाताना दिसतो आहे. विशेष म्हणजे चोरीच्या उद्देशाने मंदिरात घुसलेल्या या चोराने जरी देवाच्या समोर ठेवलेली दानपेटी लंपास केली असली, तरी मंदिरात शिरताना आणि देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना आपल्या चपला बाहेरच काढल्या होत्या.

दानपेटीची तपासणी केल्यावर त्यात मोठी रक्कम असल्याचे दिसून आल्याने चोरट्याने ती फोडून रक्कम काढण्यापेक्षा संपूर्ण दानपेटीच उचलून नेली. चोराचे हे संपूर्ण कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून चोरीच्या या घटनामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची तीव्र लाट पसरली आहे (Nagpur Robbery In Temple).

राज्य सरकार कोरोनाच्या भीतीपोटी मंदिर उघडण्याला परवानगी देत नसल्याने याचा गैरफायदा चोरटे उचलत आहेत. घरफोडी करणारे चोर सर्व समानांची नासधूस करत मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारतात. नागपूरमध्येही मंदिरातील चोरी करताना असाच काहीसा प्रकार घडाल आहे. या चोरट्याने मंदिरातून दानपेटी चोरी करण्यापूर्वी चप्पल मात्र मंदिराबाहेर काढूनच आत मंदिरात प्रवेश केला. त्यांनतर सर्व खातरजमा करुनच आरोपीने मंदिराची दानपेटी लंपास केली आहे. दानपेटी चोरणारा हा चोरटा अद्याप पकडला गेलेला नाही, त्यामुळे त्यात भक्तांनी दान केलेली किती रक्कम होती. या संदर्भात खुलासा होऊ शकला नसला तरी पोलीस त्या चोरट्याचा शोध घेत आहेत.

Nagpur Robbery In Temple

संबंधित बातम्या :

पदभार स्वीकारताच पनवेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा धडाका, आठ वर्ष जुन्या हत्याकांडातील आरोपी गजाआड

ड्रग्ज प्रकरणातील कोरोना पॉझिटीव्ह आरोपीचे रुग्णालयातून पलायन; मुंबई पोलिसांची शोधाशोध

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.