शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या; 24 तासात दोन हत्येच्या घटनांनी लोणावळा हादरलं

राहुल शेट्टी यांच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रांनी वार करत जवळून तीन गोळ्या मारण्यात आल्या आहेत.

शिवसेना माजी शहरप्रमुख राहुल शेट्टी यांची हत्या; 24 तासात दोन हत्येच्या घटनांनी लोणावळा हादरलं

पुणे : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि शिवसेना संस्थापक उमेशभाई शेट्टी यांचे पुत्र राहुल उमेश शेट्टी (Rahul Shetti Murder) यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोर जयचंद चौकातच ही धक्कादायक घटना घडली (Rahul Shetti Murder).

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शेट्टी यांच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रांनी वार करत जवळून तीन गोळ्या मारण्यात आल्या आहेत. त्यांना तातडीने लोणावळ्यातील परमार रुग्णालयात हालविण्यात आले. मात्र, तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घेषित केलं. यावेळी परमार रुग्णालयाच्या बाहेर शेट्टी सर्मथकांनी मोठी गर्दी केली होती.

लोणावण्यात गेल्या 24 तासात दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्या हत्येच्या घटनांमुळे संपूर्ण लोणावळा हादरलं आहे. राहुल शेट्टीपूर्वी दसर्‍याच्या रात्री हनुमान टेकडी येथील गणेश नायडू या युवकाचा देखील धारदार शस्त्रांनी वार करुन खून झाल्याची घटना घडली होती (Rahul Shetti Murder).

या दोन्ही घटनांनी लोणावळा शहर हादरुन गेले आहे. मागील चार पाच दिवसापूर्वीच लोणावळ्यात सुरज आग्रवाल नामक युवकाला दोन गावठी पिस्टल, कोयता आणि चाकू या हत्यारांसह पकडलं होता. एकामागोमाग एक घडलेल्या या घटनांनी लोणावळा शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, राहुल शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी एक प्रत्यक्षदर्शी असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

Rahul Shetti Murder

संबंधित बातम्या :

धक्कादायक! गाडी अडवली म्हणून पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, चौघांनी तलवारीने केले वार

मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला राजकोटमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *