घरातून अपहरण झालेल्या दहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह सापडला, साताऱ्यात हळहळ

त्रिंबक दत्तात्रय भगत यांच्या दहा महिन्यांच्या मुलाचे मंगळवारी संध्याकाळी अपहरण झाले होते, मात्र घराजवळील विहिरीत त्याचा मृतदेह सापडला

घरातून अपहरण झालेल्या दहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह सापडला, साताऱ्यात हळहळ

सातारा : राहत्या घरातून अपहरण झालेल्या दहा महिन्यांच्या बाळाचा मृतदेह सापडल्याने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. घराजवळ असलेल्या विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह सापडला. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात जोडप्याने बालकाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Sleeping Baby Kidnapped From Satara Home found dead)

त्रिंबक दत्तात्रय भगत यांचा मुलगा ओमकारचे मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अपहरण झाले होते. लोणंद पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ बाळाचा कसून शोध घेत होते. मात्र घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत आज बाळाचा मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय झालं?

त्रिंबक दत्तात्रय भगत यांच्या दहा महिन्यांच्या मुलाचे मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अपहरण झाले. ते आपल्या कुटुंबासह सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेल्या काळज गावात राहतात. चार मुलींच्या पाठीवर झालेला ओमकार हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.

भगत कुटुंबीय शेतात कामासाठी गेल्याने घरात कोणीच नव्हते. या संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्ती घरात शिरली आणि घरात झोपलेल्या दहा महिन्यांच्या चिमुकल्या ओमकारचे अपहरण केले.

त्रिंबक भगत यांच्या मोठ्या मुलीने हा प्रकार पाहिला आणि आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत अपहरणकर्ता बाळाला घेऊन पसार झाला. अपहरणकर्त्याचे वय अंदाजे 22 ते 25 वर्षे असल्याची माहिती आहे. त्याने अंगात काळा शर्ट आणि जीन्स घातली होती, तर त्याच्यासोबत असणाऱ्या महिलेने गुलाबी ड्रेस घातला होता. ते दोघे दुचाकीवरुन पसार झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.


संबंधित बातम्या :

साताऱ्यात घरात झोपलेल्या 8 महिन्यांच्या बाळाचे अपहरण, दुचाकीवरुन आलेल्या जोडप्यावर संशय

बायकोशी भांडण, जिलेटीनची कांडी तोंडात पकडून स्फोट, डोक्याच्या चिंधड्या

(Sleeping Baby Kidnapped From Satara Home found dead)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *