रडण्याला कंटाळून मातेने नऊ महिन्यांच्या मुलाला संपवलं, चोराने मंगळसूत्र खेचून बाळाची हत्या केल्याचा बनाव

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बांगरवाडी येथे शेतातील वस्तीत राहणाऱ्या सार्थक स्वानंद तुपे या नऊ महिन्याच्या बालकाचा शनिवारी खून झाला

रडण्याला कंटाळून मातेने नऊ महिन्यांच्या मुलाला संपवलं, चोराने मंगळसूत्र खेचून बाळाची हत्या केल्याचा बनाव

सोलापूर : सोलापुरातल्या मातेने नऊ महिन्यांच्या पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळाच्या सततच्या रडण्याला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलले. आरोपी महिला अश्विनी तुपे हिला पोलिसांनी अटक केली आहे. (Solapur Mother kills nine months old baby)

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे अज्ञात व्यक्तीने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून बाळाला जमिनीवर आपटून खून केल्याचा बनाव अश्विनीने केला होता, मात्र तो हाणून पाडत पोलिसांनी तिला जेरबंद केलं.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बांगरवाडी येथे शेतातील वस्तीत राहणाऱ्या सार्थक स्वानंद तुपे या नऊ महिन्याच्या बालकाचा शनिवारी खून झाला होता. अज्ञात व्यक्तीने शेतात येऊन आपल्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. हा प्रकार घडताना बाळाचा आवाज आल्याने त्याने आपल्या बाळाचा जमिनीवर आपटून खून केल्याची तक्रार बाळाची आई अश्विनी तुपे हिने दिली होती.

हेही वाचा : “पोलिसांना सांग, मी दोघींना ठार मारलंय” पत्नी-आईच्या हत्येनंतर अ‍ॅथलिट इक्बाल सिंह यांचा मुलाला फोन

नऊ महिन्याच्या बाळाचा खून करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. इतर कोणत्याही मार्गाने सुगावा लागत नव्हता. त्यामुळे बाळाच्या आईकडे पोलिसांचा संशय बळावला. त्यादृष्टीने पोलिसांनी तिची उलट तपासणी सुरु केली.

“बाळाचे वडील वाहनचालक असल्याने सतत बाहेर असतात. पहिल्या मुलाचे वय अडीच वर्षे आणि मृत मुलाचे वय नऊ महिने आहे. दोन मुले असल्याने पूर्ण वेळ त्यांना सांभाळ करण्यात जातो. त्या मुलाचे सततचे रडणे व किरकिर होत असल्याने त्या त्रासाला कंटाळून मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून त्याचा आपण खून केला” अशी कबुली अश्विनी तुपेने पोलिसांना दिली. अश्विनीला पोलिसांनी अटक केली आहे

(Solapur Mother kills nine months old baby)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *