AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘व्हॅलेंटाईन्स डे’ नाही, अरविंद केजरीवालांनी शपथविधीसाठी निवडला वेगळा मुहूर्त

अरविंद केजरीवाल यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तो दिवस होता 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे!

'व्हॅलेंटाईन्स डे' नाही, अरविंद केजरीवालांनी शपथविधीसाठी निवडला वेगळा मुहूर्त
| Updated on: Feb 12, 2020 | 11:09 AM
Share

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारल्यानंतर ‘आम आदमी पक्षा’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. येत्या रविवारी म्हणजेच 16 फेब्रुवारीला दिल्लीतील प्रसिद्ध रामलीला मैदानावर केजरीवालांचा शपथविधी (Arvind Kejriwal Oath Ceremony Date) होणार आहे.

काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांच्यानंतर अरविंद केजरीवालही दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक साधणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने 62 जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ 8 जागांवर समाधान मानावं लागत आहे. काँग्रेसचा पुरता सुपडासाफ झाला आहे. दिल्लीतील सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

14 फेब्रुवारीचं कनेक्शन तुटलं

अरविंद केजरीवाल यांनी सर्वात आधी 28 डिसेंबर 2013 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र, 49 दिवसांनंतर 14 फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’ला त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

2013 मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला 31, ‘आप’ला 28 आणि काँग्रेसला 8 जागांवर विजय मिळाला होता. या त्रिशंकू स्थितीत ‘आप’ने काँग्रेसला सोबत घेत सरकार स्थापन केलं होतं. मात्र अवघ्या 49 दिवसांमध्येच अरविंद केजरीवाल यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.

मोठ्या राजकीय नाट्यानंतर 2015 मध्ये दिल्लीत पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. ‘आप’ने या निवडणुकीत पूर्ण ताकद लावून 70 पैकी 67 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेसला खातंही उघडता आलं नव्हतं, तर भाजपला केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी 14 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर जनतेचे आभार मानले. दिल्लीतील ‘आप’ कार्यालयाबाहेर केजरीवालांनी माध्यमांशी संवाद साधला. “सर्व दिल्लीवासीयांचे आभार. त्यांनी मला तिसऱ्यांदा निवडून देऊन ही संधी दिली. हा कामाचा विजय आहे, हा देशाचा विजय आहे, हा भारतमातेचा विजय आहे”, असं केजरीवाल म्हणाले. दिल्लीवालो आपने कमालही कर दिया, I Love You, असं म्हणत केजरीवालांनी दिल्लीकरांवरील प्रेम (Arvind Kejriwal Oath Ceremony Date) जाहीर केलं.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.