VIDEO | कोरोनाकाळात वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एमपीएससी परीक्षेसाठी एक वाढीव संधी, लवकर शासन निर्णय येणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचार संहिता अंमलात असल्याने यासंदर्भातील शासन निर्णय 10 डिसेंबर, 2021 ते 15 डिसेंबर, 2021 दरम्यान काढण्यात येईल, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोविड परिस्थितीमुळे वयोमर्यादा ओलांडलेला कुणीही उमेदवार परिक्षा देण्यापासून वंचित राहणार नाही, असे भरणे म्हणाले.

VIDEO | कोरोनाकाळात वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एमपीएससी परीक्षेसाठी एक वाढीव संधी, लवकर शासन निर्णय येणार
MPSC च्या परीक्षा सुरळीत पार पडल्या
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 10:29 PM

मुंबई : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून MPSC आणि सरळ सेवेच्या भरती प्रक्रिया होवू शकल्या नव्हत्या. त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे एमपीएससी परीक्षा देता आल्या नाहीत. यामुळे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्न ऐरणीवर होता. मात्र आता वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना काळजी करण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना राज्य सरकार एक वाढीव संधी देण्याच्या विचार करीत आहे. लवकरत राज्य शासन याबाबत निर्णय घेईल आणि सदर बाबीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्र लोकसेवा आयोगास देण्यात येतील.

काय म्हणाले दत्तात्रय भरणे?

सदर नोकर भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा देता येत नसल्याने उमेदवारांचे हित लक्षात घेऊन सर्व उमेदवारांना MPSC परिक्षेकरीता एक वाढीव संधी देण्यासंदर्भातील निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचार संहिता अंमलात असल्याने यासंदर्भातील शासन निर्णय 10 डिसेंबर, 2021 ते 15 डिसेंबर, 2021 दरम्यान काढण्यात येईल, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोविड परिस्थितीमुळे वयोमर्यादा ओलांडलेला कुणीही उमेदवार परिक्षा देण्यापासून वंचित राहणार नाही, असे भरणे म्हणाले.

खासदार संभाजीराजेंनीही मुख्यमंत्र्यांना दिले होते पत्र

कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर पडल्या. विविध संवर्गातील जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. यामध्ये काही विद्यार्थ्यांची वयाची मर्यादा संपली. यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वयोमर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केली होती. याबाबत खासदार संभाजीराजेंनी मध्यस्थी करुन विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कळवली होती. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खासदार संभाजीराजेंनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दोन वाढीव संधी द्यावी अशी मागणी केली होती. दरम्यान शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. (An increased opportunity for MPSC exams for candidates who have crossed the age limit in Corona period)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.